Coronavirus : पुण्यात ‘कोरोना’चा कहर ! 24 तासात 10 जणांचा मृत्यू तर 399 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 264 जणांचा बळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं पुणे शहरात अक्षरशः कहर केला आहे. गेल्या 24 तासात कोरोनामुळं 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर तब्बल 399 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. पुण्यात आलापर्यंत कोरोनामुळं तब्बल 264 जणांचा बळी गेला आहे.

कामाशिवाय घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे. बाहेर पडताना मास्क परिधान करा असंही सांगण्यात येत मात्र काही जण सोशल डिस्टेन्सिंग पाळत नसल्याचं समोर आलं आहे. दरम्यान, सोमवारी पुणे शहरात 399 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 399 रूग्णांमध्ये ससूनमधील 11, नायडूमधील 329 आणि खासगी रूग्णालयातील 59 रूग्णांचा समावेश आहे. बाधित रूग्णांपैकी 179 क्रिटिकल रूग्णांवर उपचार चालू आहेत. त्यापैकी 44 रूग्ण हे व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. दरम्यान, दिवसभरातील चांगली बाब म्हणजे तब्बल 175 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये नायडूमधील 122, ससूनमधील 7 आणि खासगी रूग्णालयातील 46 जणांचा समावेश आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 5181 एवढी झाली आहे. आतापर्यंत 2735 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात 2182 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like