Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6006 नवे पॉझिटिव्ह, 75 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे तब्बल 6006 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत तर दिवसभरात तब्बल 75 हजार रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये 54 रूग्ण हे पुण्यातील आहेत तर 21 रूग्ण हे पुण्याबाहेरचे होते. दिवसभरात 5 हजार 609 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या तब्बल 3 लाख 60 हजार 803 वर गेली आहे. त्यापैकी 2 लाख 99 हजार 780 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 54 हजार 967 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह असून त्यापैकी 1236 जण हे क्रिटिकल आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरूआहेत. आतापर्यंत पुण्यात तब्बल 6 हजार 56 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 24 हजार 506 जणांचा स्वॅब घेण्यात आला होता. त्यापैकी 6006 जणांचे कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.