Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 3033 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वजण सरकारी यंत्रणा युध्दपातळीवर काम करत आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 3033 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, दिवसभरात 1693 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहे तर 72 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांपैकी 48 जण पुण्यातील आहेत तर 24 रूग्ण हे पुण्याबाहेरील आहेत.

पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांचा आकडा आता 4 लाख 57 हजार 986 वर गेला आहे. त्यापैकी 4 लाख 28 हजार 23 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात सध्या कोरोनाचे 22 हजार 304 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण सक्रिय रूग्णांपैकी 1413 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे पुण्यातील 7 हजार 659 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 12 हजार 409 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 1 हजार 693 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.