Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 4010 जण झाले ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या 24 तासात तब्बल 4 हजार 10 जण कोरोनामुक्त झाले आहेत. पण, दिवसभरात तब्बल 74 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्याबाहेरील 23 जणांचा तर पुण्यातील 51 जणांचा समावेश आहे. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 1 हजार 165 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

सध्या पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 47 हजार 729 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 4 लाख 9 हजार 484 जण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 30 हजार 836 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. त्यापैकी 1402 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 7 हजार 409 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात 11 हजार 499 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 1 हजार 165 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.