Coronavirus in Pune : पुण्यात कोरोनाचा कहर सुरूच ! आज (रविवारी) देखील आढळले 6400 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, 73 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यास रोखण्यासाठी केंद्र, राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहेत. आज (रविवार) पुण्यात कोरोनाचे तब्बल 6 हजार 443 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर गेल्या 24 तासात तब्बल 73 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुण्यातील 53 जणांचा तर पुण्याबाहेरील 20 जणांचा समावेश आहे.

आज दिवसभरात 4 हजार 712 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 56 हजार 636 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 1 हजार 250 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता तब्बल 3 लाख 67 हजार 237 वर जाऊन पोहचली आहे. समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 3 लाख 4 हजार 492 रूग्ण हे उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना रूग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 6 हजार 109 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 24 हजार 72 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 443 जणांचा कोरोनाचा अहवाल हा सकारात्मक (पॉझिटिव्ह) आला आहे. नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगचे नियम पाळावेत असे आवाहन यापुर्वी वेळावेळी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.