Coronavirus in Pune : पुण्यात कोरोनाचा कहर ! गेल्या 24 तासात 2800 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 28 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुणे शहरातील आणि परिसरातील नवीन कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या देखील वाढत आहे. गेल्या 25 तासात पुणे शहरात कोरोनाचे तब्बल 2 हजार 834 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात पुणे शहरातील 15 तर पुण्याबाहेरील 13 जणांचा म्हणजेच एकुण 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

आज दिवसभरात 808 जण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 29 हजार 383 वर जाऊन पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 2 लाख 5 हजार 478 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं तब्बल 5 हजार 17 जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरात सद्यस्थितीत कोरोनाचे 18 हजार 888 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. त्यापैकी 499 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात 12 हजार 625 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 2 हजार 834 जणांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क परिधान करावे तसेच सोशल डिस्टेन्सिंगच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी करण्यात येत आहे.