Coronavirus in Pune | पुणेकरांनो, काळजी घ्या ! कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या वाढतीय, जाणून घ्या आजची आकडेवारी

पुणे न्यूज (pune news) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होत असल्याचं आकडेवारीवरून समोर आलं होतं. मात्र, पुन्हा एकदा कोरोनाच्या नवीन रूग्णांची संख्या हळू-हळू वाढत असताना आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 333 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दरम्यान, दिवसभरात 187 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासात पुण्यातील 13 कोरोनाबाधितांचा (Coronavirus in Pune) मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 8 जणांचा देखील मृत्यू झाला आहे. Covid Cases Increase In PMC Areas In Last 24 Hours

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 76 हजार 826 वर जाऊन पोहचली आहे. आतापर्यंत तब्बल 4 लाख 65 हजार 756 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 2 हजार 516 अ‍ॅक्टीव्ह रूग्ण आहेत. एकुण सक्रिय रूग्णांपैकी 323 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळं 8 हजार 554 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आज 5 हजार 696 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 333 जणांचा कोरोनाचा अहवाल हा सकारात्मक आला आहे.

Web Title :- coronavirus in pune | Covid Cases Increase In PMC Areas In Last 24 Hours

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

BJP MLA Gopichand Padalkar । गोपीचंद पडळकरांचा घणाघात; म्हणाले – ‘ओबीसी नेत्याचं माकड झालंय’

Career in photography । फोटोग्राफीची आवड आहे? तर मग करिअर? जाणून घ्या सविस्तर

Ajit Pawar | उपमुख्यमंत्री अजित पवार आता भाजपच्या रडारवर? थेट CBI चौकशीचा मांडणार ठराव