पुणे जिल्ह्यात ‘या’ 11 नगरपालिका हद्दीत सर्वाधिक रुग्ण; 63 ‘हॉटस्पॉट’

पुणे : पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात आजपर्यंत (ता.१६) एकूण ७६ हजार ५६४ रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्णांपैकी ७२ हजार ५९४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय १ हजार ६६३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.ग्रामीण भागात कोरोनाचे ६३ हॉटस्पॉट आहेत. यापैकी ५२ हॉटस्पॉट हे ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात तर, उर्वरित अकरा हॉटस्पॉट हे नगरपालिकांमध्ये आहेत. हॉटस्पॉट असलेल्या नगरपालिकांत बारामती, दौंड. इंदापूर, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, तळेगाव दाभाडे, सासवड, जुन्नर, लोणावळा आणि शिरूर या नगरपालिकांचा समावेश आहे.

हॉटस्पॉट बनलेल्या गावांमध्ये घोडेगाव, म्हाळुंगे पडवळ अवसरीखुर्द, मंचर (सर्व ता. आंबेगाव), माळेगाव बुद्रूक, पणदरे, गुणवडी,मोरगांव (ता. बारामती), नसरापूर (भोर), कुरकुंभ, यवत, गोपाळवाडी,लिंगाळी, केडगाव (ता. दौंड), देहू, नांदेड, नऱ्हे, लोणी काळभोर, मांजरी बुद्रूक, कदमवाकवस्ती, कोंढवे-धावडे, उरुळीकांचन, वाघोली,केसनंद,आव्हाळवाडी (ता. हवेली), भिगवण, निरगुडे, अकोले, पिंपळे (ता.इंदापूर),नारायणगाव, वारूळवाडी, ओतूर, उंब्रज (ता. जुन्नर), कुरुळी, मेदनकरवाडी,निघोजे (ता. खेड), कामशेत (ता. मावळ), बावधन, भूगाव, हिंजवडी, माण,म्हाळुंगे, मारुंजी, सूस (ता. मुळशी), कोळविहिरे, पिंपरे खुर्द (ता.पुरंदर), तळेगाव ढमढेरे, रांजणगाव गणपती, मांडवगण फराटा, न्हावरा आणिशिरूर ग्रामीण (ता. शिरूर) आदींचा समावेश आहे.