Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 2 हजार पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, 11 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या 24 तासात शहरात 2 हजार 14 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर यापुर्वी तपासणी केलेल्या 573 जणांचे रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आज दिवसभरात 2 हजार 587 नव्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे. दिवसभरात शहरातील 11 जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्याबाहेरील 5 जणांचा आज पुण्यात कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

दिवसभरात 769 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 2 लाख 23 हजार 797 वर पोहचली आहे. त्यामध्ये सर्वात समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत तब्बल 2 लाख 3 हजार 785 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या शहरात कोरोनाचे एकुण 15 हजार 32 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 425 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. कोरोनामुळं शहरातील 4 हजार 980 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात तब्बल 11 हजार 230 जणांचे स्वॅब घेण्यात आले आहेत.