Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6600 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 58 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 6 हजार 679 नवे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत तर दिवसभरात तब्बल 58 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे शहरातील 48 तर पुण्याबाहेरील 10 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 4 हजार 628 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या पुण्यात कोरोनाचे 52 हजार 476 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 1 हजार 45 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 3 लाख 29 हजार 661 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 2 लाख 71 हजार 437 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत पुण्यातील तब्बल 5 हजार 748 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 24 हजार 773 जणांचे स्वॅब घेण्यात आले असून त्यापैकी 6 हजार 679 जणांचा कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.