Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये 24 वर्षीय युवकाला ‘कोरोना’ची लागण

पोलीसनामा ऑनलाईन टीम – कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला असून जेष्ठ नागरिकानंतर आता तरुणांनाही कोरोनाचा संसर्ग होऊ लागला आहे. पिंपरी चिंचवडमधील एका 24 वर्षीय तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भाीतीचे वातावरणा पसरले आहे.

राज्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील करोना बाधित रुग्णांचा वाढत चालला आहे. शुक्रवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचा संसर्ग झालेला प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात एका 24 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात करोना बधितांचा आकडा हा 12 वर पोहोचला आहे. पुण्यातील आकडाही 10 वर आहे. त्याबरोबर मुंबईतही एकाला लागण झाली असून राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता 52 झाली आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांपैकी पाच जणांची प्रकृती बरी झाली आहे. त्यांना लवकरच सुटी देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणखी तीन नवे रुग्ण सापडल्याचेही त्यांनी सांगितले.