Coronavirus in Pune : पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 4 हजारांपेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, 88 जणांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या 24 तासात पुण्यात कोरोनाचे 4 हजार 69 नवे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत तर तब्बल 88 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुण्यातील 67 तर पुण्याबाहेरील 21 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 4 हजार 339 रूग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुण्यातील एकुण कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता 4 लाख 23 हजार 587 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 3 लाख 73 हजार 816 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 42 हजार 907 रूग्ण हे अ‍ॅक्टीव्ह आहेत. एकुण अ‍ॅक्टीव्ह रूग्णांपैकी 1 हजार 402 रूग्ण हे क्रिटिकल असून त्यांच्यावर अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 6 हजार 864 जणांचा बळी गेला आहे. आज दिवसभरात 19 हजार 336 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 4 हजार 69 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आढळून आला आहे.