Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 284 रूग्ण ‘कोरोना’मुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरात (Pune City) कोरोना (Coronavirus in Pune) बाधित रुग्णांच्या (Patient) संख्येत वेगाने घट होत आहे. तसेच सक्रिय रुग्णांची (active patient) संख्या कमी झाल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. नवीन रुग्णांपेक्षा (new patient) बरे होणाऱ्या रुग्णांची (Recovery rate) संख्या अधिक आहे. पुणे शहरात (Pune City) गेल्या 24 तासात 257 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. Coronavirus in Pune | pune coronavirus news updates today

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

पुणे शहरात गेल्या 24 तासात 257 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4 लाख 75 हजार 097 वर पोहचली आहे. पुणे शहरात (Pune City) दिवसभरात 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 08 रुग्ण शहरातील आहेत तर 11 रुग्ण शहराबाहेरील आहेत. आतापर्यंत 8 हजार 509 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरात 2 हजार 703 रुग्ण सक्रीय आहेत.

 

पुण्यात 437 रुग्ण गंभीर

दरम्यान 284 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह (Report negative) आल्याने त्यांना घरी सोडण्यात (Discharge) आले आहे. आजपर्यंत 4 लाख 63 हजार 885 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रावर 5 हजार 817 स्वॅब तपासणी (Swab check) करण्यात आली. आज पर्यंत शहरात 25 लाख 98 हजार 737 प्रयोगशाळा चाचण्या (Laboratory test) करण्यात आल्या आहेत. शहरातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी (active patient) 437 रुग्ण गंभीर आहेत. तर 669 रुग्ण ऑक्सिजनवर (Oxygen) उपचार घेत आहेत. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने दिली आहे.

पुणे जिल्ह्यात 10 हजार ॲक्टिव्ह रुग्ण
पुणे जिल्ह्यातील (Pune district) कोरोना बाधीत एकूण 10 लाख 35 हजार 246 रुग्णांपैकी 10 लाख 7 हजार 93 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्ण (Active patient) 10 हजार 746 आहे. कोरोनाबाधित एकूण 17 हजार 407 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.68 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.28 टक्के आहे.

Wab Title :- Coronavirus in Pune | pune coronavirus news updates today

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

हे हि वाचा

17 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे चमकणार नशीब, ग्रह-नक्षत्रांचे संकेत, इतरांसाठी असा आहे गुरुवार

‘या’ IPS अधिकाऱ्याची संपत्ती होणार जप्त; राजस्थान, गुजरात येथे आहे प्रॉपर्टी

शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! मोदी सरकारने DAP वर वाढवली 700 रु. सबसिडी, आता इतक्या रुपयांना मिळेल खत