Coronavirus in Pune : पुणेकरांसाठी थोडा दिलासा ! गेल्या 24 तासात 4673 जण ‘कोरोना’मुक्त, 2837 नवे पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारसह राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. पुण्यात गेल्या 24 तासात तब्बल 4 हजार 673 जण कोरोनातून बरे झाले आहेत. उपचारानंतर त्यांना हॉस्पीटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे तर दिवसभरात 2 हजार 837 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. दिवसभरात तब्बल 82 जणांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये पुण्याबाहेरील 23 तर पुण्यातील 59 जणांचा त्यामध्ये समावेश आहे.

सध्या पुणे शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या आता 4 लाख 44 हजार 539 वर जाऊन पोहचली आहे. त्यापैकी 4 लाख 649 रूग्ण हे उपचारानंतर बरे झाले असून त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या पुणे शहरात कोरोनाचे 36 हजार 586 रूग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. आतापर्यंत पुण्यात कोरोनामुळे 7 हजार 304 जणांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात 17 हजार 118 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी 2 हजार 837 जणांचा कोरोनाचा अहवाल सकारात्मक आला आहे.