Pune News : 3 सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू, एकाच कुटुंबातील 11 जण पॉझिटिव्ह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – काही दिवसांच्या विश्रांतीनंतर दौंड तालुक्यात कोरोना संर्सगाने पुन्हा जोमाने डोकेवर काढले आहे. दौंड तालुक्यातील पाटस परिसरात कोरोना संसर्ग रुग्णांचा आलेख वाढत चालला आहे. मागील वीस दिवसात परीसरात तब्बल २१ जणांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. यापैकी मागील आठदिवसात कोरोना संसर्गबाधित तीन सख्या भावांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग चांगलाच अलर्ट झाला आहे. ग्रामीण भागातील पाटस परिसरात मागील वीस दिवसात तब्बल २१ जण कोरोना बाधीत झाले. यामध्ये एकाच कुटंबातील अकरा जणांचा समावेश आहे. कोरोना बाधीत झालेल्या बहुतांश बरे होवून घरी परतले आहे.मात्र, तीन सख्या भावांची मृत्यूशी सुरु असलेली झुंज उपयशी ठरली. आठ दिवसात काही दिवसांच्या फरकाने तीनही भावांचा मृत्यू झाल्याची काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. शुक्रवारी (ता. १९), रविवारी (ता. २१) तर गुरुवारी (ता. २५) या दिवसांचा समावेश आहे.

याबाबत सरपंच अवंतिका शितोळे म्हणाल्या, ”कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही नागरीकांना, व्यापाऱयांना मास्क लावणे, गर्दी टाळणे आदी आवाहन केले आहे. तरी नागरीकांनी काही त्रास होत असल्यास आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. आठवडे बाजारात गर्दी टाळण्याच्या उद्देशाने योग्य नियोजन केले जाणार आहे.” तसंच ”सध्या गावातील एकूण २१ रुग्णापैकी पाच जणांवर उपचार सुरु आहेत. इतर रुग्ण बरे झाले आहेत. (मृत्यू झालेल्या व्यक्ती सोडून) दरम्यान, गावातील वाढती कोरोना संख्या लक्षात घेता आरोग्य विभाग पुर्णता अलर्ट झाला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने आशा वर्कस यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कुटुंबात व्यक्तींमध्ये सर्दी, खोकला, ताप आदींची माहीती घेतली जात आहे.” अशी माहीती आरोग्य सेवक भिमराव बडे यांनी दिली.