Coronavirus : अमेरिकेत मृत्यूचं ‘तांडव’ ! ‘कोरोना’च्या बळींची संख्या 67 हजारावर

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने अमेरिकेत थैमान घातले आहे. कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेत मृत्यूने तांडव घातला असून अमेरिकेतील मृत्यूंचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अमेरिकेत मृतांची संख्या 67 हजारांपेक्षा अधिक झाली आहे. मागील 24 तासांमध्ये मिशिगन राज्यात 232 जणांचा मृत्यू झाला असू एकूण मृतांची संख्या 4 हजारापेक्षा अधिक झाली आहे.

अमेरिकेतील सर्वत 50 राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यातील काही राज्यांनी बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले असल्याची परिस्थिती आहे. अमेरिकेतील काही राज्यांमध्ये लॉकडाऊनच्या विरोधात आंदोलन पुकारण्यात आले होते. शनिवारी मिशिगन राज्यात मृत्यांचा दर 903 टक्क्यांवर पोहचला होता. तर लॉकडाऊनच्या विरोधात बंदुका घेऊन काहींनी आंदोलन केले. या राज्यात 28 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आले आहे.

न्यूयॉर्क राज्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये 3 लाख 19 हजार जणांना कोरोनाची बाधा झाली असून 24 हजारापेक्षा अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर न्यूजर्सीमध्ये 1 लाख 23 हजार जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून 7700 जणांचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झाला आहे.

अमेरिकेत 11 लाख 60 हजाराहून अधिकजणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1 लाख 73 हजार कोरोनाबाधितांनी आजारावर मात केली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे अमेरिकेत 1 लाखापेक्षा कमी मृत्यू होतील असा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी प्रयत्न सुरु असून काही ठिकाणी आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र आहे.