Coronavirus World Update : सिंगापूरमध्ये एक महिन्याच्या ‘लॉकडाऊन’ची घोषणा,’कोरोना’चे जगातील 13 महत्वाचे अपडेट्स, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे जगभरात हाहाकार माजवला आहे. जगातील 204 देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूची लागण तब्बल 10 लाख 16 हजाराहून अधिक जणांना झाली आहे. तर 52 हजार लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 2 लाख 12 हजाराहून अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे. या साथिच्या आजाराचा अमेरिकेवर वाईट परिणाम झाला आहे. मागील 24 तासात 29 हजारांपेक्षा अधिक जणांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली आणि 1169 लोकांचा मृत्यू झाला आहे. या संख्येमुळे अमेरिकेत मृतांचा आकडा 6 हजाराच्या पुढे गेला आहे. अमेरिकेत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 44 हजार झाली आहे.

कोरोना विषाणूची अपडेट्स :

1. स्पेनमध्ये सलग दुसर्‍या दिवशी 900 हून अधिक लोकांचा मृत्यू
2. इराणच्या संसदेचे अध्यक्ष अली लारीजानी यांना कोरोनाची लागण
3. ‘द योगी बियर शो’ मध्ये आवाज देणाऱ्या ज्युली बेनेटचे कोरोनामुळे निधन
4. पाकिस्तानमध्ये कोरनाची लागण झालेल्यांची संख्या 2,400 च्या वर
5. सिंगापूरमध्ये एक महिन्याचा लॉकडाऊन
6. दक्षिण कोरीयामध्ये 86 नवीन रुग्ण, एकूण संख्या 10,000 च्या वर
7. मृतांच्या स्मरणार्थ चीन 4 एप्रिल रोजी स्मृतीदिन साजरा करणार
8. 180 अमेरिकन सैनिकांची चाचणी निगेटिव्ह, अमेरिकेने सैनिकांना जहाजावरून हटवले
9. जगभरात कोरोना रुग्णांची संख्या दहा लाखांहून अधिक
10. इटलीमध्ये लॉकडाउन 13 एप्रिलपर्यंत वाढवले
11. कोरोनामुळे फ्रान्समध्ये 5000 जणांचा मृत्यू मृत्यू
12. अमेरिकेत 24 तासांत हजाराहून अधिक जणांचा मृत्यू
13. डोनाल्ड ट्रम्प यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह