Coronavirus Impact : जगभरात जूनपर्यंत जाऊ शकतात 30 कोटी पेक्षा अधिक लोकांच्या नोकऱ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एकीकडे कोरोना विषाणूच्या महामारीमुळे जगभरात लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे, तर दुसरीकडे नोकऱ्यांबाबतही गंभीर संकट निर्माण होत आहे. संयुक्त राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनुसार, जगभरात ३०० कोटीहून अधिक लोक आपल्या नोकऱ्या गमावू शकतात. संघटनेने पुन्हा एकदा कोरोनामुळे जाणाऱ्या नोकऱ्यांचा अंदाज वर्तवला आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मते जगातील एप्रिल ते जून दरम्यान केवळ तीन महिन्यांतच जवळपास ३०.५ कोटी लोक पूर्णवेळच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

संघटनेने मागील अंदाजात म्हटले होते की जूनच्या तिमाहीत दर आठवड्यात सरासरी ४८ तास काम करणाऱ्या १९.५ कोटी पूर्णवेळ नोकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. या महामारीवर मात करण्यासाठी जगभरात लॉकडाऊन वाढवण्यासाठी अंदाजाचे संशोधन करणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे. संघटनेने म्हटले आहे की या महामारीमुळे अनौपचारिक क्षेत्रातील १.६ अब्ज कामगारांच्या रोजीरोटीस धोका निर्माण झाला आहे, कारण महामारीमुळे त्यांच्या कमावण्याचे साधन थांबले असून हे जगातील ३.३ अब्ज कमर्चाऱ्यांपैकी निम्मे आहे.

८.४ टक्क्यांनी वाढून २३ टक्के झाला बेरोजगारी दर
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) म्हणणे आहे की जगभरातील बेरोजगारीचा दर मार्चच्या मध्यात ८.४ टक्क्यांवरून २३ टक्के झाला आहे. तर सीएमआयईच्या आकडेवारीनुसार, शहरी भागात १५ मार्च २०२० रोजी बेरोजगारीचा दर ८.२१ टक्के होता. २२ मार्च २०२० रोजी तो ८.६६ टक्के झाला. २९ मार्च २०२० रोजी तो ३०.०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर ५ एप्रिल २०२० च्या आकडेवारीनुसार ३०.९३ टक्क्यांवर आला आहे.

देशात बेरोजगारी वाढली
भारतात कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे बेरोजगारीचे प्रमाण २३.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. सीएमआयईच्या अहवालानुसार लॉकडाऊनमुळे भारताच्या शहरी बेरोजगारीचा दर ३०.९ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. पण एकूण बेरोजगारी २३.४ टक्क्यांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.