Coronavirus : इंदापूर तालुक्यात दिवसभरात ‘कोरोना’चे 63 नवे पॉझिटिव्ह

इंदापूर : सोमवार दिनांक 7 सप्टेंबर 2020 रोजी इंदापूर तालुक्याततील कोरोना बाधीत रूग्णांच्या संपर्कातील संशयीतांच्या इंदापूर व बारामती येथे घेण्यात आलेल्या 170 टेस्टमध्ये 63 रूग्ण पाॅझीटीव्ह आले आहेत. त्यामध्ये बारामती खासगी लॅबमध्ये 25 पैकी 10 तर इंदापूर रॅपिड आटिंजन टेस्टमध्ये 53 पाॅझीटीव्ह आले असुन तालुक्यात एकुण 1212 पाॅझीटीव्ह रूग्ण संख्या झाली आहे.तर तालुक्यात एकुण 49 जण मृृत्यु पावले असल्याची माहीती इंदापुर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुहास शेळके यांनी दीली आहे.

इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय कोविड केअर सेंटर अंतर्गत इंदापूर तालुक्यात सोमवारी सप्टेंबर रोजी रॅपिड आटिंजन टेस्टमध्ये 53 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये इंदापूर सोनाईनगर येथील 55 वर्षीय महिला, वालचंदनगर येथील 60 वर्षीय पुरूष, 55 वर्षीय महिला, रेडा येथील 51 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 27 वर्षीय युवक, लासुर्णे येथील 26 वर्षीय युवती, 30 वर्षिय महिला, 48 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगी, 10 वर्षीय चिमुरडा, 30 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा, 10 वर्षीय चिमुरडा,36 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय पुरूष,12 वर्षीय मुलगा, इंदापूर खडकपुरा 24 वर्षीय युवक, बेलवाडी येथील 50 वर्षीय पूरूष, गोतोंडी येथील 38 वर्षीय पुरूष, कळंब येथील 38 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 55 वर्षीय महिला, मदनवाडी येथील 35 वर्षीय पुरूषाचा समावेश आहे.

तर बेलवाडी येथील 12 वर्षीय मुलगी, खोरोची येथील 55 वर्षीय पुरूष, इंदापूर पायल ढाबा येथील 36 वर्षीय पूरूष, इंदापूर सरस्वतीनगर येथील 26 वर्षीय युवक, बेलवाडी येथील 55 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय पुरूष, 13 वर्षीय मुलगा, 66 वर्षीय जेष्ठ नागरिक, पवारवाडी येथील 40 वर्षीय पुरूष, 30 वर्षीय महिला, लाखेवाडी येथील 37 वर्षीय पुरूष, शेळगाव येथील 60 वर्षीय महिला, डाळज नं.1 येथील 30 वर्षीय महिला,12 वर्षीय मुलगा, भाटनिमगाव 30 वर्षीय पुरूष, मदनवाडी येथील 30 वर्षीय महिला, काटी येथील 35 वर्षीय पुरूष, 48 वर्षीय पुरूष, हगारेवाडी येथील 35 वर्षीय पुरूष, सरस्वतीनगर येथील 46 वर्षीय महिला, बावडा येथील 19 वर्षीय युवक, वालचंदनगर येथील 21 वर्षीय युवक, 50 वर्षीय पुरूष, भरणेवाडी येथील 32 वर्षीय महिला, 48 वर्षीय महिला, 15 वर्षीय मुलगा, 12 वर्षीय मुलगी, 13 वर्षीय मुलगा, 18 वर्षीय युवतीचा समावेश आहे.

तर बारामती येथील खासगी लॅबमध्ये तपासण्यात आलेल्या 25 पेकी 10 पाॅझीटीव्ह आले असुन त्यामध्ये तावशी येथील 35 वर्षीय पुरूष, सणसर येथील 30 वर्षीय पुरूष, 39 फाटा जाचकवस्ती येथील 22 वर्षीय युवक, शिरसाटवाडी येथील 88 वर्षीय जेष्ठ नागरिक, बोरी माळे वस्ती येथील 35 वर्षीय पुरूष, सरस्वतीनगर येथील 22 वर्षीय पुरूष, निमगाव केतकी येथील 13 वर्षीय मुलगा, 7 वर्षीय चिमुरडा, व लाखेवाडी येथील 43 वर्षीय महिला, 19 वर्षीय युवकाचा समावेश असल्याची माहीती सूत्रांनी दीली आहे.