Coronavirus : इंदापूरात तालुक्यात 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह

इंदापूर :  पोलीसनामा ऑनलाइन  (सुधाकर बोराटे)  –  इंदापूर तालुक्यातील कोरोना संक्रमीत रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असुन इंदापूर उपजिल्हा रूग्णालयाअंतर्गत कोविड केअर सेंटर लॅबमध्ये आज मंगळवार दिनांक 4 आॅगट रोजी तपासणी करण्यात आलेल्या रॅपीड फास्ट टेस्ट तपासणी रिपोर्टमध्ये एकुण 9 जण पाॅझीटीव्ह आढळुन आल्याने इंदापूर तालुक्यात आज दिवसअखेर एकुण 12 जण पाॅझीटीव्ह आल्याची माहीती इंदापूर तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय प्रभारी वैद्यकिय अधिक्षक डाॅ. एकनाथ चंदनशिवे यांनी दीली.

परवा घेण्यात आलेल्या 25 जणांचा रिपोर्ट आज सकाळी प्राप्त झाला असुन यामध्ये भिगवण येथील 2 पाॅझीटीव्ह तर बाभुळगाव येथील एक असे एकुण 3 जण पाॅझीटीव्ह आले असुन 22 निगेटीव्ह आले आहेत.तर आज इंदापूर उपजिल्हा रूग्णांलय रॅपीड फास्ट टेस्ट मध्ये एकुण 9 जण पाझीटीव्ह आढळल्याने तालुक्यातील पाॅझीटीव्ह रूग्णांचा आकडा हा 12 वर पोहचला आहे. कोरोनाचा एक रूग्ण बाभुळगाव येथे सापडल्याने लाॅकडाऊनच्या सुरूवातीच्या काळापासुन आज पहील्यांदाच इंदापूर तालुक्याच्या पूर्व भागातील बाभुळगावने खाते उघडल्याने नागरीकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

इंदापूर तालुक्यात आजपर्यंत एकुण 224 रूग्ण पाॅझीटीव्ह आढळले असुन त्यापैकी 149 जणांना घरी सोडण्यात आले आहे.तर तालुक्यात एकुण 74 अॅक्टीव रूग्ण असुन इंदापूर कोविड सेंटरमध्ये एकुण 39 जणांवर उपचार सुरू आहेत.तर तालुक्यात एकुण 10 जणांचा मृृृत्यु झाल्याची माहीती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दीली आहे. प्रशासनाकडुन कोरोना बाधीत भागातील एरीया सील करून योग्य त्या उपाय योजना करण्याची प्रक्रीया राबविण्यात येत असुन नागरीकांनी दक्षता घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

दर दिवसागणीक कोरोणाच्या रूग्णांमध्ये होनारी वाढ ही इंदापूर तालुक्यातील नागरीकांची डोके दुखी वाढवीणारी ठरत असल्याने इंदापूर तालुक्यात पुन्हा कडक लाॅकडाउन करण्याची गरज असल्याचे दीसुन येत आहे.तर इंदापूर तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या इंदापूर शहरातील परीस्थीती ही हाताबाहेरची असुन नागरीकांकडून इंदापूरात प्रशासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.शासनाच्या कोणत्याही नियमांचे पालन होत नसल्याने इंदापूर शहरामध्ये दिवसभर मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाचा धोका वाढत चालला असुन नागरीकांनी शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसिलदार सोनाली मेटकरी व इंदापूर उपजिल्हा रूग्णांलयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डाॅ.एकनाथ चंदनशिवे यांनी केले आहे.