Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे विक्रमी 57118 नवे पॉझिटिव्ह तर 764 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 17 लाखाच्या टप्प्यात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा संसर्ग सतत वाढत चालला आहे. शनिवारी एका दिवसात आतापर्यंतच्या सर्वात जास्त केस समोर आल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकड्यांनुसार एका दिवसात 57,118 प्रकरणे आली आहे. मागील 24 तासात 764 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 दिवसात 36569 लोक बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत संसर्गाची एकुण प्रकरणे 16,95,988 झाली आहेत. भारताचा रिकव्हरी रेट 64.4% वरून वाढून 64.5% झाला आहे. आंध्र आणि महाराष्ट्रातून 10 हजारपेक्षा जास्त नवीन प्रकरणे समोर आली आहेत. तमिळनाडुत आता बांगलादेश (जगात नंबर 16) पेक्षा जास्त कोरोना प्रकरणे आहेत. शुक्रवारी 5.25 लाख टेस्ट झाल्या. मात्र, या टेस्ट गुरुवारच्या तुलनेत 1.16 लाख कमी होत्या. भारतात आतापर्यंत एकुण 1.94 कोटी टेस्टींग झाले आहे. तिकडे आसाममध्ये शुक्रवारी कोविड-19 ची 1,862 नवी प्रकरणे समोर आल्याने एकुण संसर्गाची प्रकरणे वाढून 40,269 झाली आहेत. राज्यात 9 दिवसांचे एक बाळसुद्धा कोविड-19 ने संक्रमित आढळले आहे. याशिवाय कोविड-19 संक्रमणामुळे आणखी 4 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 98 झाली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी ही माहिती दिली.

सरमा यांनी सांगितले की, राज्यात सध्या 9,811 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. संक्रमणातून आणखी 1,277 रूग्ण बरे झाल्याने बरे होणार्‍यांची संख्या 30,357 झाली आहे. त्यांनी ट्विट केले की, मागील 24 तासात 38,324 नमूण्यांची तपासणी करण्यात आली, ज्यामध्ये 1,862 लोक संक्रमित आढळले. संक्रमित होण्याचा दर 4.85 टक्के आहे. आसाममध्ये आतापर्यंत एकुण 40,269 प्रकरणे समोर आली आहेत, ज्यापैकी 14,974 प्रकरणे राजधानी गुवाहाटीमध्ये आढळली आहेत.

प. बंगालमध्ये 70,188 प्रकरणे, मृतांची संख्या 1,581
पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी कोविड-19 ची एका दिवसात सर्वाधिक 2,496 नवी प्रकरणे समोर आली. यामुळे एकुण संख्या 70,188 झाली आहे. याशिवाय आणखी 46 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात एकुण मृतांची संख्या वाढून 1,581 झाली आहे. राज्यात 2,496 नवी प्रकरणे आल्यानंतर एकुण संक्रमितांची संख्या 70,188 झाली आहे. सध्या राज्यात 20,233 लोकांवर उपचार सुरू आहेत. राज्यात संसर्गातून बरे होण्याचा दर 68.92 टक्के आहे. विभागाने सांगितले की, संक्रमणामुळे कोलकातामध्ये एका दिवसात 21 लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय शुक्रवारी उत्तर 24 भागात 13, दक्षिण 24 भागात 3, हावड़ा, हुगली अणि मुर्शिदाबादमध्ये 2-2 तसेच नादिया, मालदा आणि अलीपुरद्वार जिल्ह्यांत 1-1 व्यक्तीचा मृत्यू झाला.

मुंबईत 1,100 नवी प्रकरणे, आणखी 53 मृत्यू
मुंबईत कोरोना वायरस संक्रमणाची शुक्रवारी 1,100 नवी प्रकरणे समोर आली. तर, आणखी 53 लोकांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने ही माहिती दिली आहे. येथे 1,100 नवी प्रकरणे समोर आल्याने आतापर्यंत संक्रमित झालेल्यांची संख्या वाढून 1,14,287 झाली आहे, तर संक्रमणामुळे आणखी 53 लोकांच्या मृत्यूमुळे एकुण मृतांची संख्या वाढून 6,350 झाली आहे. शहरात सध्या 20,569 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. 787 नवीन संशयीत रूग्ण हॉस्पिटलमध्ये भरती केले आहेत. शहरात संक्रमणातून बरे होण्याचा दर 76 टक्के आहे.

बीएमसीने म्हटले की, शुक्रवारी संक्रमण मुक्त झाल्याने 689 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. अशाप्रकारे बरे होणार्‍यांची एकुण संख्या वाढून 87,074 झाली आहे. संक्रमणामुळे मरणार्‍या 53 रूग्णांपैकी 45 रूग्ण अन्य आजाराने ग्रस्त होते. येथे संक्रमण वाढीचा दर 0.92 टक्के आहे. तर दुप्पट होण्याचा कालावधी 76 दिवस आहे. यामध्ये म्हटले आहे की, शहरात 617 सक्रिय निषिद्ध क्षेत्र आहेत, जेथे कोरोना व्हायरस संक्रमण रोखण्यासाठी सील केलेल्या इमारतींची संख्या घटून 5313 झाली आहे.

युपीत एका दिवसात सर्वाधिक 4,453 नवी प्रकरणे
उत्तर प्रदेशात मागील 24 तासात कोरोना वायरस संक्रमणाची 4,453 नवी प्रकरणे समोर आली, जो एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे. संक्रमणामुळे आणखी 43 मृत्यू झाल्याने शुक्रवारी एकुण मृतांचा आकडा 1630वर पोहचला आहे. अपर मुख्य सचिव (उपचार आणि अरोग्य) अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, मागील 24 तासात संक्रमणाची 4,453 नवी प्रकरणे समोर आली. उपचार सुरू असणार्‍या प्रकरणांची संख्या आता 39, 968 झाली आहे. आज समोर आलेली 4453 नवी प्रकरणे राज्यातील एका दिवसातील सर्वाधिक प्रकरणे आहेत. यापूर्वी गुरूवारी 3765 नवी प्रकरणे समोर आली होती, त्याच दिवशी संक्रमाणामुळे 57 लोकांचा मृत्यू झाला होता. जो एका दिवसात झालेला सर्वाधिक मृतांचा आकडा आहे.

प्रसाद यांनी सांगितले की, राज्यात 48, 663 लोक बरे होऊन घरी गेले आहेत. संक्रमणामुळे आतापर्यंत 1630 लोकांचा मृत्यू झाला आहे. आयसोलेशन वार्डात 34,973 लोक आहेत, ज्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. तर संस्थागत विलगीकरण केंद्रांमध्ये 2584 लोक आहेत, ज्यांच्या नमूण्यांची तपासणी केली जात आहे. गुरूवारी राज्यात तपासणीचा नवा विक्रम झाला. एका दिवसात एकुण 1,15,618 नमूण्यांची तपासणी करण्यात आली, हा राष्ट्रीय स्तरावर सुद्धा रेकॉर्ड आहे, असा दावा प्रसाद यांनी केला आहे.

आरोग्य विभागाच्या बुलेटिननुसार, 43 मृत्यूंपैकी 6 कानपुरमधील आहेत. तर लखनऊ, वाराणसी आणि बरेलीमध्ये 5-5 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत सर्वात जास्त 199 मृत्यू कानपुरमध्ये झाले आहेत. मेरठमध्ये 107 आणि आगरामध्ये 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात राजधानी लखनऊमध्ये सर्वात जास्त 562 नवर प्रकरणे आली. कानपुरमध्ये 321, बरेलीमध्ये 295 आणि प्रयागराजमध्ये 231 प्रकरणे समोर आली. राज्यात आतापर्यंत एकुण 23, 25, 428 नमूण्यांची तपासणी झाली आहे. गुरूवारी पूल तपासणीच्या माध्यमातून 5-5 नमूण्यांचे 3358 पूल लावण्यात आले, ज्यामध्ये 531 मध्ये संक्रमण आढळले. 10-10 नमूण्यांचे 302 पूल लावण्यात आले, ज्यापैकी 30 संक्रमित आढळले.