Coronavirus : दररोजच्या ‘कोरोना’च्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा अमेरिका आणि ब्राझीलच्या पुढं भारत, गेल्या 24 तासात 56282 नवे पॉझिटिव्ह

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतात कोरोना व्हायरस संक्रमितांचा आकडा 19 लाख 50 हजारांच्या वर पोहोचला आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार बुधवारी सकाळी 8 ते गुरुवार सकाळी 8 या 24 तासांत 56 हजार 282 नवीन रुग्ण आढळले. एवढेच नव्हे तर या दरम्यान 904 लोकांचा मृत्यू झाला आहे. यांनतर बुधवारीदेखील भारतात आढळलेली कोरोना प्रकरणे जगात सर्वाधिक आहेत. म्हणजेच, एका दिवसात अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा जास्त प्रकरणे आढळली आहेत. मंत्रालयाने म्हटले की, सध्या देशात कोरोनाचे 5,95,501 सक्रिय रूग्ण आहेत, तर आतापर्यंत 40,699 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी या विषाणूच्या संसर्गातून 13,28 336 लोक बरे झाले आहेत.

दिल्लीत रिकव्हरी रेट झाला कमी
जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात मृत्यूची संख्या 40 हजारांच्या पुढे गेली आहे. त्याचबरोबर एकूण मृत्यूंमध्ये भारत जगात 5 व्या क्रमांकावर आहे. देशातील मृत्यूचे प्रमाण 2.07% आहे तर जागतिक दृष्टीने ते 3.75% आहे. यासह, आज भारतात 20 लाख प्रकरणे ओलांडण्याची शक्यता आहे. बुधवारी आयसीएमआरने 6.64 लाख चाचण्या घेतल्या, ही आतापर्यंतची सर्वात जास्त चाचणी संख्या आहे. यापूर्वी 2 ऑगस्ट रोजी 6.61 लाख चाचण्या केल्या गेल्या होत्या. आतापर्यंत देशभरात एकूण 2.21 कोटी चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

आकडेवारीनुसार 3 दिवसानंतर महाराष्ट्रात 10 हजाराहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली असून त्यासह राज्यात 3 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. राज्यात सध्या रिकव्हरी रेट 65.2% आहे. गेल्या 24 तासांत आंध्र प्रदेशात 1 लाखाहून अधिक लोक बरे झाले पण 10 हजारांहून अधिक नवीन प्रकरणे समोर आली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीबद्दल बोलताना, रिकव्हरी रेट 90% वरून 89.9% पर्यंत खाली आला आहे, तर एकूण सक्रिय प्रकरणे 10,000 च्या वर आहेत.