COVID-19 : भारतात 9 लाखापेक्षा जास्त ‘कोरोना’बाधित, मग कसा नाही सामुहिक ‘संसर्ग’, आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं कारण, जाणून घ्या

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : देशात कोरोना विषाणूच्या 9 लाखाहून अधिक रुग्णांनंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हे स्पष्ट केले आहे की देशात संक्रमणाचा समुदाय प्रसार (Community transmission) झालेला नाही. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत डॉ. हर्षवर्धन म्हणाले की आजपर्यंत देशात कोरोनाचा कुठलाही समुदाय प्रसार झालेला नाही आणि आकडेवारी याची पुष्टी करतात. मुलाखतीत त्यांना एका प्रश्न विचारण्यात आला की ‘काही राज्ये असे म्हणत आहेत की जे प्रकरण समोर येत आहेत त्यांना त्यांच्या सुरूवातीबद्दल काही माहिती नाही, मग अशात केंद्र सरकार कम्यूनिटी ट्रांसमिशन घोषित करण्यास का मागेपुढे पाहत आहे?’

त्यास उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले- ‘सध्या कम्यूनिटी ट्रांसमिशनची कुठलीही निश्चित व्याख्या नाही. आमच्याकडे असलेल्या आकडेवारीनुसार आणि संक्रमणाच्या स्थितीच्या आकलनानुसार आम्ही प्रत्येक वेळी या प्रश्नाचे उत्तर आणि परीक्षण करण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी आपल्या समोर येणारे परिणाम म्हणजे देशात कुठेही समुदाय प्रसार नाही.’

लोकल ट्रान्समिशन होऊ शकते – आरोग्य मंत्री

मंत्री म्हणाले- ‘कदाचित काही भागात लोकल ट्रान्समिशन असेल जसे धारावी, जिथे आपण चांगले नियंत्रण मिळवले आहे आणि जागतिक आरोग्य संघटनेनेही यावर चर्चा केली आहे. मी पुन्हा एकदा संपूर्ण आत्मविश्वासाने, ठामपणे सांगत आहे की देशात कुठेही समुदाय प्रसार नाही. आकडेवारी देखील याची पुष्टी करत आहे.’

मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोविड-19 च्या संसर्गाची 28,498 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, त्यानंतर देशात संसर्ग होण्याचे प्रमाण 9 लाखांच्या पुढे गेले आहे. त्याच वेळी, आणखी 553 लोकांच्या मृत्यूनंतर या विषाणूने मरण पावलेल्या लोकांची संख्या वाढून 23,727 झाली आहे.