Coronavirus : ‘कोरोना’चा ‘सामना’ करण्यात भारत ‘टॉप’वर, चीन-अमेरिकेलाही टाकलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात कहर माजवला आहे. आत्तापर्यंत या व्हायरसने ५८३३ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास १.५५ लाखांहून अधिक लोक यामुळे संक्रमित झाले आहेत. भारतातही कोरोना रुग्णांच्या आकड्यानं शंभरी पार केलीये, तर दोन जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ३२ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद आहे. दरम्यान, महत्वाची बाब म्हणजे भारताची लोकसंख्या जवळपास १३५ कोटींहून अधिक आहे. तरीदेखील संक्रमण फैलावण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. याउलट इटलीसारख्या देश जो आकाराने छोटा असूनही याठिकाणी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या जास्त आहे.

चीनच्या वुहान शहरापासून सुरुवात झालेल्या या कोरोनामुळे चीनमध्ये आत्तापर्यंत ३००० हून अधिक जणांचा बळी घेतला तर जवळपास ८१ हजार संक्रमितांची नोंद आहे. अमेरिकेत ५७ जणांचा मृत्यू तर जवळपास ३ हजार संक्रमित आहेत, त्यांनतर सर्वात वाईट स्थिती इटलीमध्ये दिसून येते, इथे आत्तापर्यंत १४०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून २१ हजारांहून अधिक जणांना संक्रमण झालंय. ही आकडेवारीच दर्शवते कि, भारतासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात त्यातुलनेनं कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यात बरीच खबरदारी घेण्यात आलेली आहे.

१) अमेरिकेच्या आधीच भारताने परदेशातून दाखल होणाऱ्या प्रवाशांची चाचणी सुरू केली होती. २२ जानेवारीपासूनच भारताकडून विमानतळावर प्रवाशांची चाचणी सुरु झाली. तर अमेरिकेमध्ये ही चाचणी २५ जानेवारीपासून सुरु झाली.

२) परदेशात अडकलेल्या भारतीयांना रेस्क्यू करण्याच्या भूमिकेत भारत टॉपवर राहिला. चीन, ईराण, इटली इत्यादी देशांतून भारतीयांना सुटका करून त्यांना मायदेशात परत आणलं गेल. रविवारीदेखील ईराणहून २३४ तर इटलीहून २१८ भारतीयांना परत आणण्यात आलं.

३) महत्वाचे म्हणजे भारतानं आपल्या नागरिकांसोबतच १० हून अधिक देशांतील नागरिकांनाही कोरोना प्रभावित देशातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. यामध्ये मालदीव, म्यानमार, बांग्लादेश, चीन, अमेरिका, मादागास्कर, नेपाळ, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांसारख्या देशांचाही समावेश आहे.

४) भारतानं सुरुवातीपासूनच कोरोनाग्रस्त रुग्णांना इतरांपासून वेगळं ठेवण्यासाठी ‘आयसोलेशन कॅम्प’ची व्यवस्था केली. परदेशातून आलेल्या आणि कोरोना संक्रमित लोकांना वेगळं ठेवण्यासाठी आयसोलेशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं. त्यामुळे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांपर्यंत व्हायरस पोहोचण्याची भीती टाळली. आत्तापर्यंत कोणत्याही कोरोना प्रभावित व्यक्तीनं सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांवर टीका केलेली नाही.

महत्वाचे म्हणजे, कोरोनाची भीती पसरण्याआधीच सरकारनं या विषाणूबद्दल जनजागृती पसरवण्याचं काम करत योग्य ती पावले उचलली. भारतात सगळ्या सरकारी यंत्रणा वेळीच अलर्ट झाल्या. त्यामुळेच विरोधी पक्षालाही केंद्र सरकारच कौतुक करावं लागलंय. काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी मोदी सरकारच्या प्रयत्नांबद्दल संतुष्टी व्यक्त केलीय.