Coronavirus : 2 महिन्यापेक्षा कमी काळात भारत बनला PPE चा दुसरा सर्वात मोठा उत्पादक, यामध्ये केवळ चीनच्या पाठीमागे देश

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – भारत दोन महिन्यापेक्षाही कमी काळात व्यक्तीगत संरक्षण उपकरण (पीपीई) तयार करणारा दुसरा सर्वात मोठा उत्पादक ठरला आहे. सरकारने गुरूवारी या संबंधीची माहिती दिली. चीन पीपीईचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.

वस्त्र मंत्रालयाने एका वक्तव्यात म्हटले की, त्यांनी पीपीईची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्हीमध्ये सुधारणा करण्यासाठी पावले उचलली आहेत. या कारणामुळेच भारत दोन महिन्यात पीपीईचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक बनला आहे. आता भारत याबाबतीत फक्त चीनच्या पाठीमागे आहे.

मंत्रालयाने म्हटले की, या निर्मितीमध्ये केवळ प्रमाणित कंपन्याच पीपीईचे उत्पादन करतील, हे मंत्रालयाने निश्चित केले आहे. आता वस्त्र समिती, मुंबईसुद्धा आरोग्य कर्मचारी आणि अन्य कोविड-19 योद्ध्यांसाठी आवश्यक पीपीईचे परिक्षण आणि प्रमाणित करतील.

You might also like