Remdesivir : रेमडेसिवीर इंजेक्शन आणि कच्या मालावरील कस्टम ड्युटी सरकारने केली रद्द; आता मिळतील स्वस्त औषधे

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   देशात प्राणघातक कोरोना विषाणूच्या वाढत्या घटनांमध्ये सरकारने Remdesivir, याचा कच्च माल आणि अँटी व्हायरल औषधे बनवण्यासाठी लागणाऱ्या इतर साहित्यावरील कस्टम ड्युटी रद्द करण्याची घोषणा केली आहे. या चरणामुळे Remdesivir इंजेक्शनचा घरगुती पुरवठा वाढेल आणि खर्च कमी करण्यास मदत होईल.

कोणत्या उत्पादनावरील कस्टम ड्युटी कमी झाली?

महसूल विभागाने जरी केलेल्या अधिसूचनेत असे म्हंटले आहे की, जनहिताच्या दृष्टीने या उत्पादनावरील कस्टम ड्युटी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे. यापुढे ज्या उत्पादनांवर आयात शुल्क लागणार नाहीत, त्यात Remdesivir अ‍ॅक्टिव्ह फार्मोस्युटिकल इंग्रिडीएन्ट्स(API), इंजेक्शन Remdesivir आणि Remdesivir च्या निर्मितीमध्ये वापरले जाणारे बीटा साइक्लोडेक्ट्रीन यांचा समावेश आहे. कस्टम ड्यूटीची ही सूट ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल.

पियुष गोयल यांनी ट्विट करून माहिती दिली

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट केले की, ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना रुग्णाच्या आरोग्य सेवेची प्राथमिकता लक्षात घेऊन Remdesivir एपीआय, इंजेक्शन आणि इतर साहित्य आयात शुल्कात सूट दिली आहे. यामुळे पुरवठा वाढेल आणि खर्च कमी होईल, ज्यामुळे रुग्णांना दिलासा मिळेल.”

यापूर्वी ११ एप्रिल ला Remdesivir ची वाढती मागणी लक्षात घेता, परिस्थिती सुधारण्यापर्यंत केंद्राने त्यांचे इंजेक्शन आणि एपीआयच्या नियतीवर बंदी घातली होती. NPPA ने गेल्या आठवड्यात सांगितले की सरकारच्या हस्तक्षेपानंतर अनेक औषधी कंपन्यांनी Remdesivir च्या किंमती कमी केल्या आहेत.

कॅडीला हेल्थकेअरने रेमडॅक(Remdesivir १०० mg) इंजेक्शनच्या किंमती २,८०० रुपयांवरून ८९९ रुपये केली आहे.

सिंजीन इंटरनॅशनलने यांचा ब्रँड रेमवीन ची किंमत ३,९५० रुपयांवरून कमी करून २४५० केली आहे.

हैदराबादची डॉ रेड्डीज लॅब यांनी रेडवाईएक्स ची किंमत ५,४०० वरून २,७०० केली आहे.

सिप्ला यांनी त्यांची सिपरेमी ब्रँड ची किंमत ४,००० वरून कमी करून ३,००० रुपये केली आहे.

मेलानने त्यांचा ब्रँडची किंमत ४,८०० रुपयांवरून ३,४०० रुपये इतकी केली आहे.

जुबिलेंट जेनेरिक्स यांनी त्यांच्या Remdesivir च्या ब्रँडची किंमत ४,७०० वरून ३,२०० रुपये कमी केली आहे.