Advt.

Coronavirus India : चिंताजनक ! ‘कोरोना’च्या संक्रमणानं पुन्हा तोडलं रेकॉर्ड, 24 तासात 22771 नवे पॉझिटिव्ह, 442 जणांचा मृत्यू, जाणून घ्या 9 राज्यातील परिस्थिती

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकरणांचा वेग सतत वाढत आहे. देशात 24 तासांत 22,771 नवी प्रकरणे समोर आली आहेत, ज्यानंतर देशातील एकुण प्रकरणांची संख्या 648,315 झाली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यानुसार, सध्या अ‍ॅक्टिव्ह केस 2,35,433 आहेत आणि मृतांची संख्या 18,655 झाली आहे. तर कोविड-19 संसर्गातून बरे झालेल्या रूग्णांची संख्या 3,94,226 वर पोहचली आहे. शुक्रवारी सकाळी 8 वाजतापासून शनिवारी सकाळी 8 वाजेपर्यंत म्हणजे 24 तासादरम्यान ही नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 442 लोकांचा मृत्यू झाला आहे, सोबतच 14,335 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची 6364 नवी प्रकरणे समोर आली आहेत, जी एका दिवसातील सर्वाधिक आहेत. यासोबतच राज्यात संक्रमितांची एकुण संख्या वाढून 1 लाख 92 हजार 990 झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. विभागाने म्हटले की, राज्यात महामारीमुळे 198 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे मृतांची संख्या वाढून 8376 झाली आहे.

विभागाने सांगितले की, गुरुवारी एका दिवसात सर्वाधिक 6330 प्रकरणे समोर आली होती. दुसरीकडे यशस्वी उपचारानंतर शुक्रवारी 3515 रूग्णांना हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आली आहे, ज्यामुळे रूग्णांची संख्या वाढून राज्यात 1 लाख 4 हजार 687 झाली आहे. राज्यात आतापर्यंत 10 लाख 49 हजार 277 नमुण्यांची तपाणी करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशात कोविड-19 ने आणखी 14 लोकांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात कोविड-19 ने आणखी 14 लोकांच्या मृत्यूनंतर शुक्रवारी मृतांचा आकडा 749 पर्यंत पोहचला आहे. तर मागील 24 तासात 972 नव्या प्रकरणांसह कोरोना व्हायरस संसर्गाच्या प्रकरणांची एकुण संख्या 25 हजारच्या पुढे गेली आहे. अपर मुख्य सचिव वैद्यकीय आणि आरोग्य अमित मोहन प्रसाद यांनी सांगितले की, राज्यात 7451 लोक संक्रमित आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एकुण 17, 597 लोक पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना व्हायरस संसर्गाच्या एकुण प्रकरणांची संख्या 25, 797 झाली आहे. प्रसाद म्हणाले, राज्यात नमण्यांच्या तपासणीची क्षमता 25 हजार प्रतिदिनच्या पुढे गेली आहे. गुरुवारी 27, 565 नमूने तपासले गेले. आतपर्यंत एकुण 8. 10 लाखपेक्षा जास्त नमन्यांची तपासणी झाली आहे.

दिल्लीत सुद्धा कोरोना अनियंत्रित दिसत आहे. राज्यात शुक्रवारी सुमारे 2520 केस समोर आल्या. यासोबत दिल्लीत कोरोनाच्या एकुण केस 94,600 पेक्षा जास्त झाल्या आहेत. जगात केवळ 20 देश (भारत सोडून) असे आहेत, जेथे दिल्लीपेक्षा जास्त केसेस आहेत. कतारमध्ये सुमारे 98 हजार केस आहेत. दिल्लीचा वेग पाहता वाटते की, दिल्ली लवकरच कतारला मागे टाकेल.

तमिळनाडुमध्ये शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या सुमारेच्या नव्या 4,329 केस आल्या. यासोबतच राज्यात कोरोना संसर्गाच्या एकुण रूग्णांची संख्या 1 लाखाच्या पुढे गेली आहे. तमिळनाडुमध्ये आता कोरोनाच्या एकुण केस सुमारे 1.02 लाख झाल्या आहेत. जगात केवळ 19 देश (भारत सोडून) असे आहेत, जेथे तमिळनाडुपेक्षा जास्त केस आहेत. भारताच्या या दक्षिणी राज्यात कोरोनाने 1,385 लोकांचा मृत्यू झाला आहे.

कर्नाटकात एका दिवसात सर्वात जास्त 1694 केस

कर्नाटकमध्ये शुक्रवारी एका दिवसात सर्वात जास्त 1694 लोकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यानंतर राज्यात एकुण प्रकरणे 19,710 झाली आहेत. आरोग्य विभागाने सांगितले की, आणखी 21 रूग्णांच्या मृत्यूनंतर मृतांचा आकडा 293 झाला आहे. दिवसात 471 रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. तर राज्यात 201 रूग्णांवर आयसीयुमध्ये उपचार सुरू आहेत. समोर आलेल्या 1694 प्रकरणांपैकी 994 प्रकरणे बेंगळुरूच्या शहरी भागातील आहेत. यापूर्वी 2 जुलैला सर्वात जास्त 1502 प्रकरणे समोर आली होती.

केरळात शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 211 नवी प्रकरणे समोर आली आहेत, जी एक दिवसातील सर्वाधिक आहेत, या नव्या प्रकरणांसह राज्यात एकुण संसर्गाच्या प्रकरणांची संख्या वाढून 5 हजारच्या जवळ पोहचली आहे. शुक्रवारी राज्यात 201 व्यक्ती या आजारातून बर्‍या देखील झाल्या आहेत. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सांगितले की, नव्या रूग्णांपैकी 138 लोक परदेशातून आलेले आहेत आणि 39 व्यक्ती दुसर्‍या राज्यातून आल्या आहेत. तर 27 लोका संपर्कात आल्याने संक्रमित झाले आहेत. संक्रमित झालेल्या लोकांमध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे 6 जवान आणि ड्यूटीवर तैनात पोलीस कर्मचारी यांचाही सहभाग आहे. याशिवाय अलप्पुझामध्ये एकाच कुटुंबातील 11 सदस्य आणि 1 गर्भवती महिलेचा सहभाग आहे.

राजस्थानमध्ये 10 रूग्णांच मृत्यू

राजस्थानमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाने शुक्रवारी आणखी 10 रूग्णांचा मृत्यू झाला, ज्यामुळे राज्यात संसर्गाने मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या 440 झाली आहे. यासोबतच 390 नवीन प्रकरणे समोर आल्याने राज्यात या घातक व्हायरसने संक्रमितांची एकुण संख्या 19052 झाली आहे. ज्यापैकी 3331 रूग्णांवर उपचार सुरू आहे.

मध्य प्रदेशात कोरोना व्हायरस संसर्गाची 191 नवी प्रकरणे

मध्य प्रदेशमध्ये शुक्रवारी कोरोना व्हायरस संसर्गाची 191 नवी प्रकरणे समोर आली. अशाप्रकारे राज्यात कोविड-19 च्या एकुण प्रकरणांची संख्या 14,297 झाली आहे. राज्यात मागील 24 तासात या आजाराने आणखी 4 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामुळे एकुण मृत्यूंची संख्या 593 झाली आहे. मध्य प्रदेशच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, मागील 24 तासात राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाने इंदौरमध्ये 2, भोपाळ आणि हरदामध्ये 1-1 रूग्णाचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी 234 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकुण 14,297 संक्रमित लोकांपैकी आतापर्यंत 11,049 रूग्ण बरे झाले आहेत. आता केवळ 2,655 सक्रिय प्रकरणे आहेत, ज्यांच्यावर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.

झारखंडमध्ये मागील 24 तासात कोरोना व्हायरसने 112 लोक पॉझिटिव्ह आढळल्यानंतर संक्रमितांची एकुण संख्या वाढून 2697 झाली आहे. आरोग्य विभागाच्या शुक्रवारी रात्री जारी रिपोर्टनुसार झारखंडमध्ये मागच्या 24 तासात संसर्गाची 112 नवी प्रकरणे समोर आल्याने आता राज्यात संक्रमितांची एकुण संख्या 2697 झाली आहे. आतापर्यंत राज्यात 2697 संक्रमितापैकी 2060 केवळ प्रवासी मजूर आहेत, जे विविध राज्यात आपआपल्या घरी परतले आहेत.