भारतातील पहिलं प्रकरण, 4 महिन्यानंतर महिला पुन्हा ‘कोरोना’ संक्रमित, हॉस्पीटलमध्ये केलं भरती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतात पुन्हा एकदा एखाद्या व्यक्तीला पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. घटना अहमदाबादची असून पहिल्यांदा संसर्ग झाल्याच्या 4 महिन्यानंतर महिलेला पुन्हा संसर्ग झाल्याचे आढळले आहे.

अहमदाबादमधील 54 वर्षीय महिलेला प्रथमच 18 एप्रिल रोजी अहमदाबादच्या कोविड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता पुन्हा 124 दिवसानंतर त्या पॉझिटिव आली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वास्तविक या महिलेचा 30 वर्षीय मुलगा एअरफोर्समध्ये आहे. काही दिवसांपूर्वी त्यांचा मुलगा, पत्नी आणि 3 वर्षाचे मूलगा दिल्लीहून अहमदाबाद येथे आले होते. काही दिवसांनंतर त्या महिलेला व मुलाला अचानक ताप आला आणि त्या दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्यात दोघांचीही पॉझिटिव रिर्पोट आली.

मुलाला अहमदाबादच्या डिफेन्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. महिलेला अहमदाबादच्या महानगरपालिकेशी संलग्न असलेल्या कोविड केअर सेंटर (रतन हॉस्पिटल) मध्ये दाखल केले आहे. कोविड केअर सेंटरमध्ये महिलेची अँटीबॉडी चाचणी निगेटिव आली. यानंतर आरटीपीसी (RTPC) चाचणी घेण्यात आली.

रतन हॉस्पिटलचे डॉ. प्रज्ञाेश वोरा यांचे म्हणणे आहे की, हा रिपोर्ट दुसर्‍यांदा पॉझिटिव आला आणि पुढील तपासणीसाठी अहमदाबादच्या एसव्हीपी हॉस्पिटलला माहिती देण्यात आली आहे. महिलेचे सैंपल पुन्हा घेण्यात आला असून ते एका संशोधनासाठी पुण्याच्या व्हायरोलॉजी लॅबमध्ये पाठविण्यात आले आहेत. याबाबत आयसीएमआरलाही (ICMR) कळविण्यात आले आहे.

अहमदाबाद महानगरपालिकेत कोरोनासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष डॉ. राजीव गुप्ता म्हणतात की या संपूर्ण प्रकरणाची शास्त्रीय पद्धतीने चौकशी करण्यास सांगितले गेले आहे.