Coronavirus : पहिल्या टप्प्यातील ‘लॉकडाऊन’चा शेवटचा दिवस ! ‘कोरोना’बधितांची आकडा 10 हजारांवर, आतापर्यंत 339 जणांचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनचा आज शेवटचा दिवस आहे.  देशात आतापर्यंत 10 हजारांवर  लोकांना कोरोनाची लागण झाली असून 1 हजार 12 रुग्ण बरे झाले आहेत. तर 339 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव महाराष्ट्रात असून मृत्यूदर देखील सार्वाधिक आहे. पहिल्या टप्प्यातील लॉकडाउनचा आज शेवटचा दिवस आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद मोदी आज जनतेशी संवाद साधणार आहे.

देशात लॉकडाऊन असतानाही कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे पंतपधानांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलल्या माहिती नुसार, कोरोनामुळे महाराष्ट्र 149, मध्य प्रदेश 43, गुजरात 26, पंजाब 11, दिल्ली 24, तमिळनाडु 11, तेलंगणा 16, आंध्र प्रदेश 7, कर्नाटक 6, पश्चिम बंगाल 7, जम्मू-काश्मीर 4, उत्तर प्रदेश 5, हरियाणा 3, राजस्थान 3, केरळ 3, झारखंड 2, बिहार, आसाम, हिमाचल प्रदेश और ओडिसा मध्ये प्रत्येकी एक-एक मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, काही नागरिकांनी सुरक्षितता न बाळगल्याने कोरोनाची वेगाने वाढ झाली होती.

देशातील कोरोना प्रभावित  15 राज्यांतील 24 जिल्ह्यात गेल्या 14 दिवसांत कोरोनाचा पॉझिटिव्हचा एकही रुग्ण समोर आला नाही. यात महाराष्ट्रातील, छत्तीसगड माधील दुर्ग आणि बिलासपुर, केरळातील वायनाड, मणिपुरील इंफाळ पश्चिम आणि बिहारमधील पाटना या राज्यांचा समावेश आहे. लॉकडाऊनच्या काळात देशातील प्रत्येक राज्यांतील जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता करण्यासाठी सरकरारने मालवाहतूक सुरु ठेवली होती.