Coronavirus : गुळण्या करून ‘कोरोना’ चाचणी, ICMR कडून RT-PCR च्या नव्या पद्धतीला मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोरोना(corona) संक्रमणा दरम्यान कोरोना(corona) चाचणी करण्याची एक नवी पद्धत शोधून काढण्यात आली आहे. नव्या ‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ पद्धतीला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (ICMR) परवानगी देण्यात आली आहे. उल्लेखनीय म्हणजे, नागरिकांना केवळ तीन तासांत या कोरोना चाचणीचा अहवाल हातात मिळू शकतो. चाचणीची ही नवी पद्धत पायाभूत सुविधा कमी असणाऱ्या ग्रामीण भागांत तसंच पोहचण्यासाठी अतिशय दुर्गम भागांना फायदेशीर ठरु शकेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचले, म्हणाले – ‘आगे आगे देखो होता है क्या…’

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) अंतर्गत नागपूरच्या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) च्या शास्त्रज्ञांनी चाचणीच्या या पद्धतीसह एक नवा टप्पा गाठला आहे. ICMR कडून NEERI च्या आपल्या टीमला देशभरातील लॅबमध्ये या नव्या पद्धतीचे ट्रेनिंग देण्यासाठी पाठवण्यात येणार आहे.

Video : IPL 2021 साठी UAE ला जाण्यासाठी तयार Chahal ची पत्नी Dhanashree, डान्स व्हिडिओ वायरल

कशी केली जाते ही चाचणी ?

‘सलाईन गार्गल आरटी-पीसीआर’ या पद्धतीच्या चाचणीत, रुग्णांना खारट पाण्याची गुळणी करुन ती एका सामान्य ‘कलेक्शन ट्यूब’ मध्ये जमा केली जाते. हा नमुना लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवला जातो. एका विशिष्ट तापमानात NEERI कडून तयार करण्यात आलेल्या एका विशिष्ट सोल्युशनमध्ये हा नमुना ठेवला जातो. सोल्यूशन गरम केल्यानंतर एका ‘RNA’ टेम्प्लेट तयार होतं. त्यानंतर या सोल्युशन वर आरटी-पीसीआर प्रक्रिया केली जाते.

CM ठाकरेंचे जनतेला आवाहन, म्हणाले – ‘कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता, पावसाळ्यात सर्वाधिक काळजी घ्या’ (Video)

स्वस्त आणि वेळ वाचवणारी पद्धत

‘नीरी’चे पर्यावरण विषाणू कक्षाचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनार यांनी सांगितले की, चाचणीच्या या नव्या पद्धतीत नमुने गोळा करणे आणि त्यावर प्रक्रिया करणं खूप स्वस्त पडतं. लोक स्वत:हून कोरोना संसर्गाची चाचणी करु शकतील कारण ही प्रक्रिया ‘सेल्फ सॅम्पलिंग’ला परवानगी देते. यासाठी चाचणीसाठी नमुने देताना नागरिकांना चाचणी केंद्रावर वाट पाहण्याची किंवा गर्दी करण्याची गरज नाही. यामुळे बराचसा वेळ वाचणार आहे. नव्या पद्धतीत कमीत कमी कचरा निर्माण होतो. तसेच संक्रमणाचा धोका कमी करण्यासाठी ही पद्धत फायदशीर ठरेल, असेही डॉ. खैरनार यांनी म्हटले.

 

 

Golden Blood Group : जगात फक्त 43 लोकांकडे ‘दुर्मिळ’ Rh Null Blood, जाणून घ्या काय खास

Video : ‘क्या हुआ तेरा वादा… जयवंतरावजी’; ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ म्हणाल्या…