Coronavirus : देशात 27 दिवसानंतर 3 लाखापेक्षा कमी आढळले नवे पॉझिटिव्ह, गेल्या 24 तासात 2 लाख 81 हजार नवीन केस

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेचा कहर अजूनही सुरू आहे. मात्र, आता प्रकरणे कमी होत आहेत. देशात मागील 24 तासात कोरोना व्हायरसची 2 लाख 81 हजार 386 नवी प्रकरणे समोर आली आहेत. मोठी गोष्ट ही आहे की, देशात 27 दिवसानंतर 3 लाखांपेक्षा कमी केस आल्या आहेत. शेवटच्या तीन लाखापेक्षा कमी केस 20 एप्रिल 2021 ला आल्या होत्या. तेव्हा प्रकरणांची संख्या दोन लाख 95 हजार होती. तर, काल 3 लाख 78 हजार 741 लोक बरे झाले. काल कोरोनाने 4 हजार 106 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाचे ताजे आकडे काय आहेत ते जाणून घ्या…

* एकुण केस- 2 कोटी 49 लाख 65 हजार 463
* एकुण डिस्चार्ज- 2 कोटी 11 लाख 74 हजार 76
* एकुण मृत्यू – 2 लाख 74 हजार 390
* एकुण अ‍ॅक्टिव केस- 35 लाख 16 हजार 997
* एकुण लसीकरण – 18 कोटी 29 लाख 26 हजार 460

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) ने सांगितले की, भारतात काल कोरोना व्हायरससाठी 15 लाख 73 हजार 515 सॅम्पल टेस्ट करण्यात आले. ज्यानंतर एकुण 31 कोटी 64 लाख 23 हजार 658 सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत.

कोविडवर बनवलेल्या ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची बैठक आज
राजधानी दिल्लीत आज कोविडवर बनवलेल्या ग्रुप ऑफ मिनिस्टर्सची बैठक होणार आहे. या बैठकीचे अध्यक्ष आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन असतील. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर, नागरिक उड्डयन मंत्री हरदीप पूरी, केमिकल अँड फर्टिलायझर मंत्री मनसुख मंडविया, गृह राज्यमंत्री नित्यानंद राय आणि नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल सहभागी होतील. बैठक दुपारी एक वाजता आरोग्य मंत्रालयात होईल.