Coronavirus India Update : देशात 24 तासात 25 हजारापेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह, बधितांचा आकडा 7 लाख 69 हजारच्या पुढं

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसचा कहर अजूनही सुरूच आहे. येथे पुन्हा एकदा कोविड-19ची 25 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. कोविड 19 इंडिया डॉट ओआरजीनुसार, भारतात आज कोरोना व्हायरसची 25 हजार 559 प्रकरणे समोर आली आहेत.

यासोबतच भारतात कोविड 19 ने संक्रमित रूग्णांची संख्या 7 लाख 69 हजार 053 झाली आहे. यामध्ये 2, 71, 254 रूग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. तर एक दिवसात भारतात 19,509 रूग्ण बरे झाले आहेत. यासोबतच देशात बरे झालेला रूग्णांची संख्या 4,76,554 झाली आहे. तर भारतात एका दिवसात कोरोना व्हायरसमुळे 491 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोना व्हायरसने मरण पावणार्‍यांची संख्या 21,144 झाली आहे.

महाराष्ट्रात दुसर्‍या दिवशीसुद्धा 6000पेक्षा जास्त प्रकरणे
महाराष्ट्रात पुन्हा एकदा विक्रमी प्रकरणे समोर आली आहेत. येथे आज कोरोना व्हायरसची 6 हजार 603 प्रकरणे समोर आली. तर, बुधवारी महाराष्ट्रात 5 हजारपेक्षा जास्त प्रकरणे नोंदली गेली. आज महाराष्ट्रात 6,603 नव्या प्रकरणांसह एकुण संक्रमितांची संख्या 2,23,724 झाली आहे. तमिळनाडुमध्ये 3756, दिल्लीत 2033, गुजरातमध्ये 783, तेलंगनामध्ये 2324, उत्तर प्रदेशात 1188, आंध्र प्रदेशात 1062, पश्चिमी बंगालमध्ये 986 नवी प्रकरणे नोंदली गेली आहेत.

भारतात दररोज मागील काही दिवसांपासून कोरोना व्हायरसची 20 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. 8 जुलैरोजी सुद्धा भारतात 23 हजारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली होती.