Covid-19 : 24 तासात ‘कोरोना’चे सुमारे 15 हजार नवे रूग्ण तर 445 जणांचा मृत्यू, देशात 4.25 लाख केस

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाच्या आतापर्यंत 4 लाख 25 हजार 282 केस झाल्या आहेत. 24 तासात देशात कोरोनाच्या 14,821 नव्य केस सापडल्या आहेत आणि 445 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अपडेटनुसार, देशात आता कोरोनाच्या एक लाख 74 हजार 387 अ‍ॅक्टिव केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 13 हजार 699 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 2 लाख 37 हजार 195 लोक बरे झाले आहेत.

रविवारी महाराष्ट्रात कोविड-19 संसर्गाच्या 3870 केस समोर आल्या आणि याच कालावधीत 186 लोकांचा मृत्यू झाला. ज्यानंतर राज्यात एकुण प्रकरणांची संख्या वाढून 1,32,075 झाली आहे. 24 तासात दिल्लीत संक्रमितांचा आकडा 59,746 च्या पुढे गेला आहे. संसर्गाच्या प्रकरणांमध्ये दिल्ली दुसर्‍या क्रमांकावर पोहचली आहे, तर 59,377 संक्रमितांसह तामिळनाडु तिसर्‍या स्थानी आहे.

कोरोना अपडेट्स

* 24 तासात देशभरात कोरोनाच्या 14 821 नव्या केस, 445 रूग्णांचा मृत्यू.

* देशात कोरोनाच्या 1.74 लाख अ‍ॅक्टिव्ह केस, आतापर्यंत 13699 रूग्णांनी गमावला जीव.

* गुजरातमध्ये 24 तासात 580 नव्या पॉझिटीव्ह केस समोर आल्या. संक्रमितांची संख्या 27 हजारच्या पुढे.

* दिल्लीत 27 जूनपासून सुरू होणार सेरोलॉजिकल सर्वे, 20 हजार सॅम्पलची होणार टेस्टींग.

* दिल्लीत कोरोनाची 3000 नवी प्रकरणे, संक्रमितांचा आकडा पोहचला 60 हजारच्या पुढे.

* कोरोना संकटात भारत बनला औषध केंद्र, 133 देशांना औषधांची निर्यात : एससीओ.

* महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या नव्या 3,870 केस, संक्रमितांची संख्या 1 लाख 32 हजारच्या पुढे.

* जगात 90 लाख लोक कोरोनामुळे संक्रमित.

* 24 तासात देशात कोरोनाच्या 14 821 नव्या केस सापडल्या आणि 445 रूग्णांनी जीव गमावला. देशात आता कोरोनाच्या 4 लाख 25 हजार 282 कन्फर्म केस झाल्या आहेत.

* आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या अपडेटनुसार, देशात आता कोरोनाच्या 1 लाख 74 हजार 387 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 13 हजार 699 लोकांचा जीव गेला आहे, तर 2 लाख 37 हजार 195 लोक बरे झाले आहेत.

* गुजरातमध्ये मागील 24 तासात कोरोनाची 580 नवी प्रकरणे समोर आली आहेत. येथे आता एकुण संक्रमितांची संख्या 27 हजारच्या पुढे गेली आहे.

* जगासाठी सर्वात वाईट ठरला शनिवार, यादिवशी 24 तासात सापडल्या 1.83 लाख नव्या केस.

* वाराणसी (यूपी) : ग्रीन झोनमध्ये आले हॉटस्पॉट. माधोपुर मधील सिगरा दुसर्‍यांदा रेडझोनमध्ये आले. जिल्ह्यात एकुण 174 हॉटस्पॉटमध्ये 99 ग्रीनझोन आले आहेत. 18 ऑरेंज झोनमध्ये, 57 हॉटस्पॉट रेड झोनमध्ये आहेत.

* गृह मंत्रालयाने सांगितले की, दिल्लीत 27 जून ते 10 जुलैदरम्यान सेरोलॉजिकल सर्वे केला जाईल, ज्यामध्ये 20 हजार लोकांचे सॅम्पल टेस्टींग होईल. याद्वारे दिल्लीत संसर्ग पसरण्याबाबत माहिती मिळू शकेल आणि त्यांनतर एक व्यापक रणनीती ठरवता येईल.

* डायरेक्टरेट जनरल हेल्थ सर्व्हिसेस, दिल्लीच्या सर्क्युलरनुसार, दिल्लीत केवळ 7 अशी हॉस्पिटल आहेत जे आपल्या एकुण क्षमतेच्या 60% बेडपेक्षा सुद्धा जास्त अगोदरच कोरोनाची ट्रीटमेंट करत आहेत. यासाठी यामध्ये सवलतीच्या रेटवाल्या बेडची संख्या दिल्ली सरकारने सांगितली आहे.

* दिल्लीत कोरोना संसर्गाच्या 3000 नव्या प्रकरणांसह संक्रमितांची संख्या वाढून 59746 झाली आहे. तर, या महामारीमुळे देशाची राजधानी दिल्लीत आतापर्यंत 2175 लोकांनी आपला जीव गमावला आहे.