Coronavirus India : देशात ‘कोरोना’चा नवा ‘विक्रम’ ! गेल्या 24 तासात 45720 नवे पॉझिटिव्ह तर 1129 जणांचा मृत्यू, बधितांचा आकडा 12 लाखाच्या पुढं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतात कोराना व्हायरसची एकुण प्रकरणे 12, 38,635 झाली आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार देशात सध्या 4,26,167 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत, 7,82,606 लोकांना डिस्चार्ज दिला आहे आणि 29,861 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 परदेशी नागरिक बरा होऊन आपल्या देशात परतला आहे. भारतात आतापर्यंत एकुण 1.5 कोटीपेक्षा जास्त टेस्ट झाल्या आहेत. तर बुधवारी 3.5 लाख टेस्टिंग करण्यात आल्या. गुरुवारी भारतात 45,720 नवीन प्रकरणे समोर आली.

महाराष्ट्रात 10 हजार नवीन प्रकरणे
महाराष्ट्रात आतापर्यंत एकुण 3.37 लाख प्रकरणे आहेत. येथे कोरोनाच्या केस चिलीपेक्षा (जगात 8 व्या स्थानावर) जास्त म्हणजे 3.36 लाख प्रकरणे आहेत. तर आतापर्यंत देशात पॉझिटिव्हीटी रेट 13 टक्के झाला आहे.

भारतात दुसर्‍या नंबरवर आंध्र प्रदेशात 6,045 नवी प्रकरणे नोंदली गेली. तर आंध्रात एक दिवसात 6,553 रूग्ण बरे झाले, जे 24 तासात समोर आलेल्या कोरोना केसपेक्षा जास्त आहे. कर्नाटकात आतापर्यंत 75 हजारपेक्षा जास्त कोरोना प्रकरणे आहेत, येथे एका दिवसात 4,700 प्रकरणांची वाढ झाली आहे.

नागालँडमध्ये कोरोनाची 54 नवी प्रकरणे
नागालँडचे आरोग्य मंत्री एस पंगनु फोम यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस संक्रमणाची 54 नवी प्रकरणे समोर आल्यानंतर राज्यात एकुण संक्रमितांची संख्या बुधवारी वाढून 1,084 झाली. नव्या प्रकरणांपैकी 23 दीमापुरमधून, 19 कोहिमामधून, 7 जुनहेबोटोमधून, दोन-दोन मोन आणि मोकोकचुंग तथा 1 पेरेन जिल्ह्यातून समोर समोर आली आहेत. नागालँडमध्ये 598 रूग्णांचा उपचार सुरू आहे. आतापर्यंत 486 जण या संसर्गामधून बरे झाले आहेत. यादरम्यान 32 वर्षीय एक महिला जी गुवाहाटीवरून येथून आली होती आणि दीमापुर जिल्ह्यात विलगीकरण केंद्रात राहात होती, तिचा बुधवारी मृत्यू झाला.

अरुणाचलमध्ये आतापर्यंत सुरक्षा दलांचे 167 जवान संक्रमित
अरुणाचल प्रदेश सरकारने बुधवारी सांगितले की, राज्यात आतापर्यंत विविध सुरक्षा दल आणि पोलिसांच्या 167 जवानांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे आरोग्य सचिव पी. पार्थिबन यांनी सांगितले की, या 167 पैकी भारत तिबेट सीमा पोलीस दलाचे 54, सेना आणि केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे 32-32, सीमा रस्ते कार्यदलाचे 16 जवान सहभागी आहेत. याशिवाय राज्य पोलीसांचे 31 आणि आसाम रायफल्सचे दोन जवान सुद्धा कोरोना संक्रमित आढळले आहेत.

राजस्थानमध्ये आणखी 6 मृत्यू, 961 नवी प्रकरणे
राजस्थानात कोरोना व्हायरस संक्रमणामुळे बुधवारी आणखी 6 मृत्यू नोंदले गेले, ज्यामुळे राज्यात एकुण मृत्यू 583 झाले आहेत. यासोबतच राज्यात आतापर्यंत विक्रमी 961 नवी प्रकरणे समोर आल्याने एकुण संक्रमितांची संख्या 32,334 झाली आहे, ज्यापैकी 8387 रूग्णांवर उपचार सुरू आहे.

एका अधिकार्‍याने सांगितले की, बुधवारी अलवरी, बीकानेरमध्ये तीन- तीन संक्रमितांचा मृत्यू झाला. यामुळे राज्यात एकुण मृत्यूंची संख्या 583 झाली आहे. केवळ जयपुरमध्ये कोरोना व्हायरस संक्रमणामुळे मरणार्‍यांची संख्या 179 झाली आहे. तर जोधपुरमध्ये 73, भरतपुरमध्ये 46, कोटामध्ये 30, अजमेरमध्ये 28, बीकानेरमध्ये 27, पालीमध्ये 22, नागौरमध्ये 20 आणि धौलपुरमध्ये 15 संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. अन्य राज्यांच्या 34 रूग्णांचा सुद्धा येथे मृत्यू झाला आहे.

गुजरातच्या सुरतमध्ये 11 हजार लोक संक्रमित
गुजरातच्या सूरत जिल्ह्यात बुधवारी एका दिवसात सर्वात जास्त 256 लोक कोरोना व्हायरस संक्रमित आढळल्यानंतर एकुण संख्या 11,128 झाली आहे. अधिकार्‍यांनी म्हटले की, सूरतमध्ये एका दिवसात सर्वाधिक 19 रूग्णांचा मृत्यू झाला आहे, ज्यानंतर जिल्ह्यात एकुण मृत्यूंची संख्या 503 झाली आहे. 201 नवी प्रकरणे शहरातून तर 55 प्रकरणे ग्रामीन भागातून समोर आली आहे.

गुजरातमध्ये बुधवारी कोविड-19 ची 1,020 नवी प्रकरणे समोर आल्याने राज्यात एकुण संक्रमितांची संख्या वाढून 51,485 झाली आहे. अशी माहिती राज्याच्या अरोग्य विभागाने दिली. विभागाने म्हटले की, गुजरातमध्ये आणखी 28 रूग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात मृतांची संख्या वाढून 2,229 झाली. एका दिवसात 837 रूग्ण बरे झाल्याने विविध हॉस्पिटलमधून सुटी देण्यात आलेल्या रूग्णांची एकुण संख्या वाढून 37,240 झाली. राज्यात आता उपचार सुरू असणार्‍या रूग्णांची संख्या 12,016 आहे. विभागाने म्हटले की, 3 रूग्णांचा मृत्यू अहमदाबादमध्ये, 2 रूग्णांचा मृत्यू जूनागढ मध्ये झाला. तर 1-1 रूग्णाचा मृत्यू बोटाद, दाहोद, मेहसाणा आणि वडोदरामध्ये झाला.

मुंबईत 1310 नवी प्रकरणे, 58 जणांचा मृत्यू
मुंबईत बुधवारी कोरोनाची 1310 नवी प्रकरणे समोर आल्याने एकुण प्रकरणांची संख्या वाढून 1 लाख 4 हजार 572 झाली आहे. ही माहिती बृहन्मुंबई महापालिकेने दिली. येथे एका दिवसात महामारीमुळे 58 लोकांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून 5872 झाली. या आजारातून बरे झाल्याने मंगळवारी सायंकाळी 1563 रूग्णांना घरी पाठवण्यात आले, ज्यामुळे बरे होणार्‍या रूग्णांची संख्या 75,118 झाली आहे. मुंबईत कोविड-19 रूग्णांचे बरे होण्याचा दर 71 टक्के आहे.

मुंबईत 23,582 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर कोरोना व्हायरसच्या 1055 संशयित रूग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे. मागील 7 दिवसांच्या आकड्यांच्या आधारावर मुंबईत संक्रमितांची संख्या दुप्पट होण्याचा सरासरी दर 59 दिवस आहे आणि प्रकरणांच्या वाढीचा दर 1.17 टक्के आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात कोविड-19 ची एका दिवसात सर्वात जास्त 10,576 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे राज्यात एकुण रूग्णांची संख्या वाढून 3,37,607 झाली आहे. तर आणखी 280 रूग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या वाढून 12,556 झाली आहे.