Coronavirus : ‘कोरोना’ व्हायरसचा सध्याचा वेग भीतीदायक, ईराणला पाठीमागे सोडून टॉप 10 मध्ये भारत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील कोरोना संसर्गाचा वेग आता घाबरवत आहे. जगातील सर्वात जास्त कोरोना रूग्णांच्या देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानावर पोहचला आहे. इराणला मागे टाकत भारतात एकुण कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 138,536 झाली आहे. तर, इराणमध्ये 135,701 कोरोना रूग्ण आहेत. देशात मागील चार दिवसात रोज 6000 पेक्षा जास्त नव्या केसेस समोर येत आहेत, शनिवारी यात सर्वात जास्त वाढ दिसून आली आणि विक्रमी 6767 नवीन प्रकरणे नोंदली गेली.

हाच वेग राहिल्यास स्थिती बिकट होऊ शकते. इराणमध्ये शनिवारपर्यंत 1,35,701 रूग्ण होते. तेथे सरासरी दोन हजारपेक्षा जास्त नवी प्रकरणे समोर येत आहेत. एवढेच नव्हे, जर रूग्ण असेच वाढले तर चार-पाच दिवसात तुर्कीला सुद्धा मागे टाकत भारत 9 व्या स्थानावर पोहचू शकतो. तुर्कीमध्ये सरासरी एक हजार नव्या केसेस या दिवसात समोर येत आहेत.

जाणून घ्या भारतातील अन्य राज्यांची स्थिती
हिमाचल
राज्यात संसर्गाची सहा नवी प्रकरणे समोर आली आहेत. यामुळे राज्यात कोरोना रूग्णांची संख्या 192 झाली आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, नव्या प्रकरणातील तीन ऊनामधून आणि एक-एक प्रकरण कांगडा, हमीरपुर आणि सोलन जिल्ह्यातून आहे. हे सर्व लोक नुकतेच दुसर्‍या राज्यातून परतले होते.

उत्तर प्रदेश
मागील 24 तासात 262 संसर्ग झालेले रूग्ण आढळले आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत 6081 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. 3473 डिस्चार्ज झाल्याने घरी गेले आहेत.

आंध्र प्रदेश
आंध्र प्रदेशात 66 नवी प्रकरणे समोर आल्याने राज्यात संसर्गाचे एकुण प्रकार वाढून 2,780 झाले आहेत. आरोग्य विभागानुसार, व्हायरसमुळे कोणाचाही मृत्यू झालेला नाही आणि राज्यात मृतांची संख्या अजूनही 56 आहे.

मध्य प्रदेश
देशात कोरोनाने सर्वात जास्त प्रभावित जिल्ह्यात इंदौरमध्ये रविवारी संसर्गाच्या प्रकारांची संख्या 3,000 पार केली आहे. ज्यामध्ये 114 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासादरम्यान जिल्ह्यात 75 नवे रूग्ण सापडले. जिल्ह्यात संसर्ग झालेल्या लोकांची संख्या 2,933 ने वाढून 3,008 वर पोहचली आहे.

महाराष्ट्र
महाराष्ट्रात रविवारी कोरोना संसर्गाच्या रूग्णांची संख्या 50,000 च्या पुढे गेली आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, राज्यात एक दिवसात सर्वाधिक 3041 नवी प्रकरणे समोर आली आहेत.

राजस्थान
संसर्गाने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या राज्यात 161 झाली आहे. दरम्यान, महामारीची 152 नवी प्रकरणे समोर आल्याने रूग्णांची एकुण संख्या 6,894 झाली आहे. रविवारी चित्तौडगढमध्ये आणखी एका रूग्णाचा मृत्यू झाला.

झारखंड
राज्यात रविवारी कोरोनाचे 16 नवे रूग्ण सापडले. यामध्ये जमशेदपुर आणि गढवाचे 3-3, हजारीबागचे 4, कोडरमाचे दोन आणि रांचीचा एक रूग्ण आहे. चायबासामध्ये सुद्धा 3 रूग्ण सापडले आहेत.

बिहार
बिहारच्या 20 जिल्ह्यात रविवारी 117 नवे कोरोना पॉझिटिव्ह रूण सापडले. यासोबत राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढून 2511 झाली आहे.

उत्तराखंड
राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. रविवारी सुद्धा राज्याच्या जिल्ह्यात एकुण 54 नवे रूग्ण सापडले. यापैकी सर्वात जास्त 32 रूग्ण केवळ नैनीताल जिल्ह्यातील आहेत. यासोबतच राज्यात कोरोना रूग्णांचा एकुण आकडा 298 वर पोहचला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like