Coronavirus : संपूर्ण देशाची चिंता वाढली ! जर्मनी, फ्रान्सला मागे टाकत भारत ‘कोरोना’बधितांचा संख्येत जगात 7 व्या क्रमांकावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  देशात आजपासून लॉकडाऊन ५ सुरु असतानाच संपूर्ण देशाच्या दृष् टीने अतिशय चिंताजनक बातमी येऊन थडकली आहे. जगात  कोरोना बाधित देशांच्या यादीत भारताने एकाच दिवसात जर्मनी आणि फ्रान्सला मागे टाकून भारत ७ व्या क्रमांकावर गेला आहे.

लॉकडाऊन ५ ची सुरुवात होत असतानाच गेल्या २४ तासात भारतात सर्वाधिक ८ हजार ७८२ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे भारतातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १ लाख ९० हजारांहून अधिक झाली आहे. त्यामुळे एकाच दिवसात भारताने जर्मनी आणि फ्रान्स यांना मागे टाकत ७ व्या क्रमांकावर पोहचला आहे.

फ्रान्समध्ये सध्या १ लाख ८८ हजार ८८२ आणि जर्मनीमध्ये १ लाख ८३ हजार ४९४ कोरोना बाधित रुग्ण आहेत.

२९ मे रोजी भारत टर्कीला मागे टाकून ९ व्या क्रमांकावर गेला होता. त्यावेळी भारतात १ लाख ६५ हजार ३८६ कोरोना बाधित रुग्ण होते. तेव्हा जर्मनीत १ लाख ८२ हजार तर फ्रान्समध्ये १ लाख ८६ हजार रुग्ण होते. गेल्या ३ दिवसात भारतात २५ हजारांहून अधिक रुग्ण वाढले. त्याचवेळी जर्मनीत केवळ १ हजार आणि फ्रान्समध्ये २ हजारांनी रुग्ण वाढले. त्यामुळे एकाच दिवशी भारत दोघांना मागे टाकून ७ व्या क्रमांकावर गेला आहे.

जगात अमेरिकेतील कोरोनाचा कहर अजूनही सुरुच आहे. तेथे १ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांचा आतापर्यंत मृत्यु झाला आहे.

जगातील प्रमुख देशातील कोरोना बाधित आणि मृत्यु पावलेल्यांची संख्या

अमेरिक १८३७१७०-  १०६१९५ मृत्यु

ब्राझिल –  ५१४९९२ –  २९३४१

रशिया –  ४०५८४३ –  ४६९३

स्पेन –  २८६५०९ – २७१२७

इंग्लंड –  २७४७६२ – ३८४८९

इटली –  २३२९९७ –  ३३४८९

भारत –  १९०६०९ – ५४०८

फ्रान्स –  १८८८८२ – २८८०२

जर्मनी –  १८३४९४ – ८६०५

पेरु –  १६४४७६ – ४५०६

टर्की –  १६३९४२ – ४५४०

इराण –  १५१४६६ – ७७९७

चिली –  ९९६८८ – १०५४