दिलासादायक ! दिवसभरात देशात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा दुप्पट रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्लीः पोलीसनामा ऑनलाइन – देशात थैमान घातलेली कोरोनाची (coronavirus ) दुसरी लाट आता ओसरत चालली आहे. आज जून महिन्याच्या सुरुवातीलाच समोर आलेल्या कोरोनाच्या आकडेवारीमुळे देशाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे (coronavirus ) 1 लाख 27 हजार नवे रुग्ण सापडले असून, 2 हजार 795 जणांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी (दि. 1) सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार दिवसभरात कोरोनाच्या 1 लाख 27 हजार 510 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजेच या 24 तासात तब्बल 2 लाख 55 हजार 287 जणांनी कोरोनावर मात केली आहे. म्हणजेच कोरोनाच्या coronavirus नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.

 

 

देशात प्रथमच कोरोनामुळे coronavirus दररोज होणाऱ्या मृत्यूंचा आकडा 3 हजाराच्या खाली आहे. गेल्या 24 तासांत देशामध्ये 2 हजार 795 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील एकूण कोरोनाबाधितांची coronavirus संख्या ही 2 कोटी 81 लाख 75 हजार 44 वर पोहचली आहे. तर आतापर्यंत त्यापैकी 2 कोटी 59 लाख 47 हजार 629 जणांनी कोरोनावर coronavirus मात केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे coronavirus 3 लाख 31 हजार 895 जणांचा मृत्यू झाला आहे.

देशात सध्याच्या घडीला 18 लाख 95 हजार 520 अ‍ॅक्टीव्ह रुग्ण आहेत. देशातील लसीकरणाचा Vaccination वेग वाढवण्यासाठीही केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. आतापर्यंत देशातील 21 कोटी 60 लाख 46 हजार 638 जणांना कोरोनावरील coronavirus लस मिळाली आहे.

Also Read This : 

उन्हाळ्यात तेलकट त्वचेसाठी घरच्या घरीच बनवा फेस मास्क, स्किन राहील फ्रेश अन् ग्लोईंग, जाणून घ्या

 

शरद पवारांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस थेट एकनाथ खडसेंच्या घरी, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

 

वजन कमी करण्यासाठी उन्हाळ्यात आवश्य प्या हे 3 डिटॉक्स ड्रिंक्स, जाणून घ्या बनवण्याची पध्दत

 

Pune : शेतीचा वाद ! शिरूर तालुक्यात 13 जणांकडून 5 जणांवर कुर्‍हाडीने वार, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

 

सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच

 

Sanjay Raut : ‘शरद पवारांनी फडणवीसांना सत्तेचा मंत्र सांगितला असेल’

 

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित ठेवण्यासाठी आहारामध्ये ‘या’ 5 गोष्टींचा करा समावेश; निश्चित होईल फायदा, जाणून घ्या