Coronavirus : ‘कोरोना’चे एकाच दिवसात पहिल्यांदाच ‘विक्रमी’ 20903 नवे रूग्ण, बाधितांचा आकडा 6.25 लाखावर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात वेगाने वाढत असलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाने थोडा दिलासा दिल्यानंतर आज मोठी उडी घेतली आहे. देशात प्रथमच एका दिवसात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 21 हजारच्या जवळ पोहचली आहे. आरोग्य मंत्रालयानुसार, मागील 24 तासात कोरोनाची 20,903 नवी प्रकरणे समोर आली आहेत, तर 379 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. नवी प्रकरणे समोर येण्यासह देशात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 6 लाख 25 हजार 544 झाली आहे. कोरोनाने मरण पावणार्‍यांची संख्या 18,213 झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशात कोरोनाच्या आता 2,27,439 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोना महामारीमुळे आतापर्यंत 18,213 रूग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 3,79,891 लोक बरे झाले आहेत. तर एक परदेशी नागरिक परतला आहे. कोरोना व्हायरसने सर्वात जास्त महाराष्ट्र प्रभावित असल्याचे दिसत आहे.

कोरोना व्हायरसने सर्वात जास्त प्रभावित महाराष्ट्र दिसत आहे. मागील 24 तासात महाराष्ट्रात 6330 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर, दिल्लीत एक दिवसात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 2373 आहे. तमिळनाडुत 4343, उत्तर प्रदेशात 769, पश्चिम बंगालमध्ये 649, राजस्थानमध्ये 350 आणि पंजाबमध्ये 116 नवी प्रकरणे समोर आली आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे कोरोना संक्रमित रूग्ण बरे होण्याचा आकडा सुद्धा वेगाने वाढत आहे. देशात कोरोना रूग्णांचा रिकव्हरी रेट 58.24% झाला आहे.

युपीमध्ये कोरोनाची 769 नवी प्रकरणे
उत्तर प्रदेशात मागील 24 तासात कोविड-19 ची 769 नवी प्रकरणे समोर आली आहेत. तर 17 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यात कोरोना संक्रमितांची संख्या वाढून 24825 झाली आहे. तर, राज्यात या महामारीने आतापर्यंत 735 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या उपचर सुरू असलेल्या प्रकरणांची एकुण संख्या 6869 आहे. राज्यात आतापर्यंत 17221 लोक कोविड-19 संसर्गातून बरे झाले आहेत. युपीचा कोरोना रूग्ण बरे होण्याचा दर 69.36 टक्के आहे, जो राष्ट्रीय सरासरीच्या 59.43 ने जास्त आहे.

अहमदाबाद नंतर सूरत हॉटस्पॉट
गुजरातमध्ये सूरत शहर अहमदाबादच्या नंतर कोविड-19 चे हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहे. सूरतमध्ये मागील दोन आठवड्यापासून संसर्गाच्या प्रकरणात मोठी वाढ झाली आहे. शहरात आतापर्यंत कोरोना व्हायरसची 5,000 पेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. 1 जुलैला सूरतमध्ये संसर्गाची 180 नवी प्रकरणे समोर आली आणि अहमदाबादमध्ये 208 प्रकरणे आली. या आकड्यावरून समजते की, अहमदाबादमध्ये कोविड-19च्या स्थितीत सुधारणा होत आहे. तर सुरतमध्ये स्थिती बिघडत चालली आहे.

महाराष्ट्रात 6330 नव्या केस, 125 मृत्यू
महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा कहर वेगाने वाढत आहे. येथे मागील एक दिवसात 6330 नव्या केस समोर आल्या आहेत, ज्यानंतर संक्रमितांची संख्या 1,86,626 झाली आहे. राज्यात 125 मृत्यू झाले आहेत. ज्यापैकी 110 मृत्यू 24 तासांच्या आत झाले आहेत. तर 15 मृत्यू त्यापूर्वी झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 8178 मृत्यू झाले आहेत. यासोबतच आतापर्यंत 10 लाख लोकांची तपासणी करण्यात आली आहे. मुंबईत 24 तासात कोविड-19च्या 1554 केस समोर आल्यानंतर संक्रमितांची संख्या 80,669 झाली आहे. मुंबईत 57 मृत्यू झाले आहेत, ज्यानंतर शहरात कोरोनाने मरणार्‍यांची संख्या 4689 झाली आहे.