चीन आणि चीनमध्ये राहणार्‍या परदेशी लोकांना भारतानं e-visa सुविधा नाकारली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसनं चीनमध्ये थैमान घातलं आहे. 600 हून अधिक भारतीयांना चीनमधून भारतात आणण्यात आलं आहे. आता भारत सरकारनं चीन आणि चीनमध्ये राहणार्‍या परदेशी नागरिकांना ई-व्हिसा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

केरळ राज्यामध्ये आत्तापर्यंत कोरोना व्हायरसचे 2 रूग्ण आढळले आहेत. भारत सरकारकडून सर्व ती खबरदारी घेण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. चीनमधून शनिवारी आणि रविवारी विशेष विमानाने 600 हून अधिक भारतीयांना स्वगृही आणण्यात आले होते.