Coronavirus : देशात ‘कोरोना’बधितांचा आकडा 27 लाखांच्या पुढं, 24 तासात 55079 नवे पॉझिटिव्ह तर 876 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना व्हायरसच्या रूग्णांची संख्या आता 27 लाख 2 हजार 743 झाली आहे. सोमवारी संसर्गाची 55079 नवी प्रकरणे सापडली. 24 तासात 876 रूग्णांनी जीव गमावला, तर 47 हजार 979 लोक बरे सुद्धा झाले आहेत. देशात कोरोना प्रकरणे वाढण्याचा वेग जगात पहिल्या नंबरवर कायम आहे. अमेरिका आणि ब्राझीलमध्ये काल अनुक्रमे 40,612 आणि 23,038 नवी प्रकरणे आली.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या महितीनुसार, देशात सध्या कोरोनाच्या 6 लाख 73 हजार 166 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत 51 हजार 797 रूग्णांचा जीव गेला आहे. तर, 19 लाख 77 हजार 780 लोक रिकव्हर झाले आहेत.

24 तासात या राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यू
सोमवारी सर्वात जास्त 8493 रूग्ण महाराष्ट्रात सापडले. येथे आता संक्रमितांची संख्या 6 लाख 4 हजार 358 झाली आहे. महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशात 6,780 प्रकरणे सापडली. आंध्रमध्ये संक्रमितांची संख्या 2 लाख 96 हजार 609 झाली आहे.

महाराष्ट्रात कोरोनामुळे 24 तासादरम्यान 228 लोकांचा मृत्यू झाला. यांनतर तमिळनाडुत 120 रूणांनी जीव गमावला. आंध्र प्रदेशात 82, उत्तर प्रदेशात 66, पश्चिम बंगालमध्ये 45, पंजाबमध्ये 50, मध्यप्रदेशात 23, गुजरातमध्ये 15, केरळात 13, तेलंगनात 10 आणि जम्मू-काश्मीरात 6, दिल्लीत 18, गोवामध्ये 7, त्रिपुरात 4, पुदुचेरीत 4, मणिपुरमध्ये 1, चंदीगढमध्ये 1 रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात मृतांची संख्या वाढून 20 हजाराच्या पुढे गेली आहे. 24 तासादरम्यान येथे 228 लोकांचा मृत्यू झाला. बीएमसीनुसार, मुंबईत रिकव्हरी रेट 80.37% पर्यंत पोहचला आहे, तर देशात दिल्लीत (90 टक्के) सर्वात जास्त आहे.