लॉकडाऊन 4.0 च्या 12 दिवसांमध्ये देशात ‘कोरोना’चे 70 हजार नवे रूग्ण, 1700 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना संकटामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा दोन दिवसांत पूर्ण होणार आहे. लॉकडाऊन 4.0 च्या शेवटच्या 12 दिवासांत कोरोना संसर्ग झपाट्याने वाढला आहे. जर आपण गेल्या 12 दिवसांबद्दल बोलायचे म्हणले तर कोरोनाचे 70 हजार नवीन रुग्ण आढळले आहेत आणि सुमारे 1700 लोक मरण पावले आहेत. 18 मे रोजी लॉकडाऊन 4.0 लागू करण्यात आला. त्या दिवशी देशात कोरोना रूग्णांची एकूण संख्या 96 हजार 169 होती. यापैकी 3 हजार 29 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 36 हजार 823 लोक बरे झाले होते आणि आपल्या घरी परतले होते. त्याच दिवशी कोरोनाचे 5 हजार 242 नवीन रुग्ण आढळले होते.

आरोग्य मंत्रालयाने आज जाहीर केलेल्या अहवालानुसार, 12 दिवसानंतर आता देशात कोरोना रूग्णांची संख्या वाढून 1 लाख 65 हजार 799 झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 4 हजार 706 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बरे होणाऱ्यांची संख्या वाढली ही दिलासाची बाब आहे. आता देशात सक्रीय प्रकरणांची संख्या जवळपास 90 हजार आहे.

अशी वाढत गेली दररोज संक्रमित रुग्णांची आकडेवारी
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात कोरोनाची नवीन प्रकरणे दररोज वाढत आहेत. 18 मे रोजी 5242, 19 मे रोजी 4970, 20 मे रोजी 5611, 21 मे रोजी 5609, 22 मे रोजी 6088, 23 मे रोजी 6654, 24 मे रोजी 6767, 25 मे रोजी 6977, 26 मे रोजी 653, 27 मे रोजी 6387, 28 मे रोजी 6566 आणि 29 मे रोजी 7466 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत.

अशी वाढत आहे दररोज मृत्यूची संख्या
कोरोनामुळे मृत्यूची संख्या दररोज वाढत आहे. 18 मे रोजी 157, 19 मे रोजी 134, 20 मे रोजी 140, 21 मे रोजी 132, 22 मे रोजी 148, 23 मे रोजी 137, 24 मे रोजी 147, 25 मे रोजी 154, 26 मे रोजी 146, 27 मे रोजी 170, 28 मे रोजी 194, 29 मे रोजी 175 लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला.