Coronavirus : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 14933 नवे पॉझिटिव्ह तर 312 जणांचा मृत्यू, बाधितांचा आकडा 4.40 लाखावर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील कोरोनाची प्रकरणे ४ लाख ४० हजारांवर गेली आहेत. मंगळवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात एकूण कोरोनाचे रुग्ण वाढून ४ लाख ४० हजार २१५ झाले आहेत. यात १४ हजार ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. २ लाख ४८ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत, तर ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या १ लाख ७८ हजार १४ आहे.

गेल्या २४ तासांत कोरोनाची १४ हजार ९३३ नवीन प्रकरणे आढळली आहेत आणि ३१२ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला असून, जिथे एकूण रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ७९६ वर गेली आहे आणि ६२८३ लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ६७ हजारांहून अधिक लोक बरे झाले आहेत, तर ६१ हजाराहून अधिक ऍक्टिव्ह प्रकरणे आहेत.

दिल्लीत कोरोना रूग्णांची एकूण संख्या ६२ हजारांच्या पुढे गेली आहे. या आजारामुळे २२३३ लोक मरण पावले आहेत. तर ३६ हजाराहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या २३ हजार ८२० आहे. तामिळनाडूमध्येही एकूण रुग्णांची संख्या ६२ हजारांच्या वर गेली असून ७९४ लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

गुजरातमध्ये एकूण रुग्णांची संख्या २७ हजार ८२५ आहे, ज्यामध्ये १६८४ लोकांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये सध्या ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या ६२३२ आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये एकूण रुग्णांची संख्या वाढून १८ हजार ३२२ झाली आहे, तर ५६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या ६१५२ आहे.

राजस्थानमध्ये एकूण रुग्णांची संख्या १५ हजाराहून अधिक आहे, ज्यामध्ये ३५६ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ऍक्टिव्ह प्रकरणांची संख्या २९६६ आहे. या व्यतिरिक्त पश्चिम बंगालमध्ये एकूण रुग्णांची संख्या १४ हजारांच्या पुढे गेली असून ५६९ लोकांचा मृत्यू झाला आहे. ऍक्टिव्ह प्रकरणांची एकूण संख्या ५१०२ आहे.