Coronavirus : …म्हणून पुण्याच्या परिस्थितीवर केंद्रीय पथकाने व्यक्त केली ‘चिंता’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात पुणे आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार वेगाने वाढत आहे. देशाच्या ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक आहे, त्या ठिकाणी केंद्रीय पथक पाहणीसाठी जात आहे. ही Inter-Ministerial Central Team (IMCT) पुण्याच्या दौऱ्याहून परतली आहे. या टीनमे पुण्याच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देशात कोरोनारुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीच्या वेगापेक्षा पुण्याचा वेग खूप जास्त असल्याचे निरीक्षणात  नोंदवलं आहे.

पुण्यात रुग्ण दुप्पट होण्याचा दर 7 दिवसांवर आला आहे. देशात रुग्णसंख्या दुप्पट व्हायला अधिक दिवस लागत आहेत. पुण्यात चाचणी झालेल्या 9 सँपल्समध्ये 1 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहे. देशात हे प्रमाण बरंच जास्त म्हणजे 23 चाचण्यांमागे एक पॉझिटिव्ह एवढं आहे. केंद्रीय पथकाच्या या नोंदीमुळे शहराच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. पुण्यात गेल्या आठवड्यात कोरोनाबाधितांची संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. रुग्णसंख्या 606 वरुन थे 1319 वर पोहचली आहे. म्हणजेच पुणे जिल्ह्यात दिवसाला सरासरी 100 रुग्ण आढळून येत आहेत.

27 एप्रिल रोजी राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार पुणे शहरात 969 कोरोनारुग्ण आहेत. आतापर्यंत शहरात 74 बळी गेले आहेत. राष्ट्रीय सरासरीपेक्षा हा मृत्यूदर अधिक आहे. 7 टक्के रुग्ण दगावत आहेत, याचा अर्थ देशात हे प्रमाण 3 टक्क्यांच्या आसपास आहे. सोमवारी दिवसभरात पुण्यात 78 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आणि दिवसभरात तिघांचा मृत्यू झाला. तर 49 रुग्णांची तब्येत चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

अतिसंक्रमित भागातून नागरिकांचे स्थलांतर
अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरतं स्थलांतरित लॉकडाऊनच्या काळात निर्बंध अधिक कठोर केल्यानंतरही कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे आता शेवटचा पर्याय म्हणून अतिसंक्रमित भागातील नागरिकांना हलवण्याचा उपाय पुणे महापालिका योजत आहे. अतिसंक्रमित क्षेत्रातील लोकांना तात्पुरतं स्थलांतरित करण्याची महापालिकेची योजना असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

हॉटस्पॉटमधून नागरिकांच स्थलांतर
पहिल्या टप्प्यात वीस हजार आणि नंतर 70 हजार नागरिकांचे स्थलांतर होऊ शकतं. पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण भवानी पेठ, कसबा पेठ, ढोले पाटील रस्ता या वॉर्डात आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेली दाटीवाटीची वस्ती, छोटी घरं यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून कासेवाडी आणि इतर काही झोपडपट्टी भागात कोरोनाचे अधिक रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे अशा हॉटस्पॉटमधून नागरिकांचे स्थलांतर करण्याचा उपाय पालिका करणार आहे. त्यांची तात्पुरत्या क्वारंटाईन सेंटरमध्ये त्यांची सोय करण्याची महापालिकेने तयारी आहे.