Coronavirus in India : देशात उच्चांकी 1 लाख 15 हजार नवीन कोरोना रुग्ण; 24 तासात 630 रुग्णांचा मृत्यु,

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्यापेक्षा दुसर्‍या टप्प्यात वेगाने संसर्ग पसरत असल्याचे आढळून येत आहे. गेल्या २४ तासात तब्बल १ लाख १५ हजार ७३६ नवीन कोरोना बाधित आढळून आले आहे. हा आतापर्यंतचा उच्चांक आहे. यापूर्वी १६ सप्टेंबर रोजी २४ तासात ९७ हजार ८५९ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यावेळेपेक्षा आता कोरोनाचा संसर्ग अत्यंत वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.

 

 

 

 

गेल्या २४ तासात ६३० कोरोना रुग्णांचा मृत्य झाला आहे. यापूर्वी १५ सप्टेंबर २०२० रोजी एकाच दिवशी तब्बल १२८३ जणांचा मृत्यु झाला होता. त्यामानाने आता कोरोना मृत्युचा दर कमी झाला आहे.

देशभरात आतापर्यंत १ कोटी २८ लाख १ हजार ७८५ कोरोना बाधितांची संख्या झाली आहे. त्यापैकी १ कोटी १७ लाख ९२ हजार १३५ रुग्ण बरे झाले असून सध्या देशभरात ८ लाख १७ हजार ४७३ सक्रीय रुग्ण आहेत.

देशात आतापर्यंत १ लाख ६६ हजार १७७ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. देशभरात लसीकरण मोहीमही वेगाने सुरु असून आतापर्यत ८ कोटी ७० लाख ७७ हजार ४७४ जणांना लसीचे डोस देण्यात आले आहेत.