Coronavirus : चिंताजनक ! जगभरात ‘कोरोना’बाधितांच्या संख्येत भारत 10 व्या क्रमांकावर, इराणला टाकलं मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या काही दिवसात देशात दररोज नवीन कोरोना बाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात जगात १४ व्या क्रमांकावर असलेला भारत आज थेट १० व्या क्रमांकावर पोहचला आहे.  त्याने इराणला मागे टाकले असून आशियातील सर्वाधिक कोरोना बाधितांची संख्या आता भारतात झाली आहे. भारतातील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ३८ हजार ८४५ इतकी झाली आहे. या अगोदर इराण भारताच्या पुढे होता.

मात्र, तेथे दररोज साधारण दोन ते अडीच हजार नवीन कोरोना बाधित आढळतात त्याचवेळी भारतातील नवीन कोरोना बाधितांची संख्या दररोज त्यापेक्षा दुप्पट वाढत गेल्याने भारताने इराणला सोमवारी मागे टाकले. त्याचबरोबर कोरोना बाधितांची संख्या अशीच वाढती राहिली तर पुढील ३ दिवसात भारत टर्कीला मागे टाकून ९ व्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे. सध्या इराणमध्ये एकूण १ लाख ३५ हजार ७०१ कोरोना बाधित रुग्ण आहेत. मात्र, त्यातील तब्बल १ लाखांहून अधिक रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तेथे केवळ २२ हजार ४८३ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्याचवेळी भारतात तब्बल ७७ हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

जगभरात आतापर्यंत ५५ लाख ५७७ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील ३ लाख ४६ हजार ७१९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

जगातील प्रमुख देश व त्यातील कोरोना बाधित आणि मृत्यु यांची संख्या
अमेरिका १६८६४३६ (९९३००मृत्यु)
ब्राझिल ३६५२१३ (२२७४६)
रशिया ३४४४८१ (३५४१)
स्पेन २८२८५२ (२८७५२)
इंग्लड २५९५५९ (३६७९३)
इटली २२९८५८ (३२७८५)
जर्मनी १८०३२८ (८३७१)
टर्की १५६८२७ (४३४०)
इराण १३५६४५ (७४१७)
पेरु ११९९५९ (३४५६)
कॅनडा ८४६९९(६४२४)
चीन ८२९८५ (४६३४)
सौदी अरेबिया ७२५६० (३९०)
टर्कीमध्ये सध्या दररोज साधारण ११०० ते १२०० नवीन रुग्ण वाढत आहेत. त्याचवेळी भारतात ७ हजार रुग्ण वाढत आहेत. हे पाहता पुढील तीन दिवसात भारत टर्कीचा मागे टाकून ९ व्या क्रमांकावर जाण्याची शक्यता आहे.