Coronavirus : ‘कोरोना’मुळं न्यूयॉर्कमध्ये भारतीय पत्रकाराचं निधन, PM नरेंद्र मोदींनी व्यक्त केला ‘शोक’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – जगभरात कोरोना व्हारयसमुळे अनेकांना बाधा झाली असून त्यामध्ये मृत्यूमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच न्यूयॉर्कमध्ये भारतीय वंशााचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. भारत-अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यात ब्रह्म कांचीबोटला यांचा मोठा वाटा होता असेही मोदी यांनी म्हटले आहे.

मोदी यांनी ट्विटमध्ये भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतर दुख: झाले आहे. भारत आणि अमेरिकेमधील संबंध चांगले निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे ते नेहमी लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंब आणि मित्रांसोबत माझी सहानुभूती आहे. ओम शांती. ब्रह्म कांचीबोटला हे युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे माजी सहकारी होते.

सोमवारी रात्री न्यूयॉर्कमधील रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. अमेरिकेतील अनेक भारतीयांना करोनाची लागण झाली आहे. मात्र त्याची नेमकी आकडेवारी समोर आलेली नाही. ज्या दोन राज्यांमध्ये भारतीयांची संख्या जास्त आहे तिथे कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव पहायला मिळत आहे. सोमवारी या दोन राज्यांमधील 1 लाख 70 हजार जणांना करोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. तसंच 5700 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील एकूण 33 कोटी लोकांसंख्येपैकी 95 टक्के नागरिक सध्या घरात आहेत.