Coronavirus : भारतीय लोकांमध्ये कशामुळं वेगानं वाढतेय ‘कोरोना’विरूध्द लढण्याची इम्यूनिटी ? कारण जाणून व्हाल अवाक्

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वैज्ञानिक आणि डॉक्टर सांगत आहेत की, भारतीय लोकांमध्ये कोरोना अँटीबॉडी खूप गतीने विकसित होत आहेत. अमेरिका आणि ब्रिटन सारख्या विकसित देशांमध्ये देखील ही गती कमी आहे. यामध्ये विचार करण्यासारखी गोष्ट आहे की, अनेक पश्चिमी देश सुख सुविधांनी आणि खाण्याच्या गुणवत्तेबाबत भारतापेक्षा समृद्ध आहेत, पण तरीही इम्युनिटीच्या बाबतीत भारत पुढे कसा आला. माहितीनुसार, भारतातील एकूण कोरोना बाधित लोकांपैकी प्रत्येक चार व्यक्तींच्या मागे एका व्यक्तीमध्ये कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी अँटिबॉडी तयार झाल्या आहेत. काय आहे यामागचे कारण जाणून घेऊया.

सुरुवातीला दिल्ली आणि मुंबई मध्ये कोरोनाचा प्रसार मोठ्या गतीने होत होता. पण आता या ठिकाणी आधीपेक्षा खूप फरक आहे. दिल्लीमध्ये अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आणि अनेक लोक बरे देखील झाले. असे मानले जाते की, तेथील लोकांमध्ये अँटिबॉडी तयार झाल्या. दिल्लीमध्ये सीरो ने केलेल्या सर्वेमध्ये अशी माहिती समोर आली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, विकसित देशाच्या तुलनेत भारतासारख्या विकसनशील देशात लोकांमध्ये अँटिबॉडी वेगाने विकसित होत आहेत.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अनेक पश्चिमी देश सुख सुविधांनी आणि खाण्याच्या गुणवत्तेबाबत विकसनशील देशांपेक्षा समृद्ध आहेत. विकसनशील देशातील लोक अनेक रोगांचा तसेच विषाणूंचा सामना नेहमी करत असतात, त्यामुळे त्यांच्या शरीरात रोगाशी लढण्याची ताकद जन्मतःच जास्त असते.

फ्लू आणि इन्फ्लुएंजा सारख्या आजारांशी लढण्याची ताकद भारतीय लोकांमध्ये आधीपासूनच आहे. कारण या आजाराशी त्यांचा सामना नेहमी होत असतो. याचे लक्षणं कोरोनाशी मिळतेजुळते आहेत. आणि थोडीफार इम्युनिटी औषधांमुळे मिळत आहे, याच कारणामुळे भारतीय लोकांमध्ये रिकव्हरी रेट अधिक आहे.

कोरोना हा नवीन आजार आहे, त्यामुळे यासाठी वेगळ्या प्रकारची इम्युनिटी पाहिजे. ज्या व्यक्तींना कोरोनाची लागण होऊन त्यातून बरे झाले आहेत त्यांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. या अँटीबॉडी 28 ते 40 दिवसांपर्यंत शरीरात राहू शकतात.

जागतिक आरोग्य संघटना आणि सिडीसी च्या रिपोर्ट नुसार, कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात असणाऱ्या अँटीबॉडीचा 90% भाग 28 दिवसांच्या आत संपून जातो. त्यामुळे त्या लोकांना पुन्हा कोरोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतर्कता बाळगणे महत्वाचे आहे.