रेल्वे तिकीट स्वतः ‘रद्द’ करावं अन्यथा पैसे ‘कपात’ करणार, IRCTC चा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने १४ एप्रिलपर्यंत सर्व प्रवासी सेवा पूर्णपणे बंद केल्या आहेत. अशा परिस्थितीत, ज्या प्रवाशांनी आधीच तिकिट ऑनलाईन बुक करून ठेवले होते, त्यांना आता परताव्याची चिंता भासू लागली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेने अशा सर्व प्रवाशांना दिलासा देण्याची बातमी दिली आहे. रेल्वेनुसार, प्रवाशांना परताव्यासाठी तिकिट काउंटरवर जावे लागणार नाही. ई-तिकिट आपोआप रद्द होईल आणि संपूर्ण परतावा आपोआप ज्या खात्यातून तिकिट बुक झाले त्या खात्यावर जाईल.

प्रवाशांनी स्वतः तिकिट रद्द करू नये

भारतीय रेल्वेचे म्हणणे आहे की देशभरात लोकडाउनमुळे सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रवाशांनी स्वत:चे ई-तिकिट रद्द करू नये. प्रवाशांना तिकिटांचा संपूर्ण परतावा आपोआप मिळेल.

कमी होऊ शकतात आपले पैसे

आयआरसीटीसीचे प्रवक्ते सिद्धार्थ सिंह यांचे म्हणणे आहे की जर प्रवाशांनी ई-तिकिटे रद्द केली तर त्यांच्या परताव्याची अर्धी रक्कम कमी केली जाऊ शकते.