Coronavirus : ‘या’ 2 कारणांमुळं भारत कोरोनाविरूध्दचं युध्द आरामात जिंकणार, पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टरांनी सांगितलं

पोलिसनामा ऑनलाईन टीम –   देशभरामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गासंदर्भात अनेक अफवा पसरवल्या जात आहे. त्यापार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीत स्तरावरील प्रसिद्ध आरोग्य तज्ज्ञ डॉक्टर, डी. नागेश्वर रेड्डी यांनी भारतीयांना दिलासा दिला आहे.

‘भारत कोरोनाविरुद्धचे युद्ध आरामात जिंकणार’ असा दावा पद्म पुरस्कार विजेत्या डॉक्टरांनी केला आहे. लॉकडाउनचा कालावधी हा तीन ते चार आठवड्यांपेक्षा अधिक हवा होता, अशी इच्छाही रोड्डी यांनी व्यक्त केली आहे. रेड्डी हे सध्या एशियन इन्स्टीट्यूट ऑफ गॅस्ट्रोइंन्ट्रोलॉजीचे अध्यक्ष असून 2016 साली त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

भारत कोरोनाविरुद्धची लढाई कशी जिंकेल यासंदर्भात माहिती देताना त्यांनी दोन प्रमुख कारणांचा उल्लेख केला आहे. सध्याची एकंदरित परिस्थिती भारतासाठी अनुकूल असल्याचे रेड्डी यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूची उत्पत्ती आणि त्याचे संक्रमण होण्याचा अभ्यास केल्यास डिसेंबरमध्ये चीनमधील वुहान शहरामध्ये पहिल्यांदा करोनाची उत्पत्ती झाली. त्यानंतर हा विषाणू इटली, अमेरिका आणि युरोपमधील पाश्चिमात्य देशांमध्ये वेगाने पसरला. त्यानंतर दोन तीन आठवड्यांनी हा विषाणू या देशामधून भारतामध्ये दाखल झाला. कोरोना हा एक आरएनए प्रकारातील विषाणू आहे अशी माहिती रेड्डी यांनी दिली. सोप्या भाषेत सांगायचे तर ज्याप्रमाणे मानवी पेशींची रचना डीएनएवर अवलंबून असते तशाच प्रकारे काही विषाणूंची रचना आरएनएवर आधारित असते.

कोरोना रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत असल्याने देशामध्ये भीतीचे वातावरण आहे. यासंदर्भात डॉ. रेड्डी यांनी, अनेक अभ्यासांमध्ये दहा वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांवर करोनाचा फारसा परिणाम होत नाही असा दावा केला. तसेच तरुणांवरही करोनाचा तितका प्रभाव होत नाही. सामान्यपणे 70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांना त्यातही मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर असे आजार असणार्‍यांना क ोरोनाचा सर्वाधिक धोका आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like