‘कोरोना’चा कहर ! इंडिगो करणार कर्मचाऱ्यांच्या पगारात ‘कपात’, एअर इंडिया देखील तयारीत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसचा फटका एअरलाइन्सला देखील बसत आहे. इंडिगोने गुरुवारी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याची घोषणा केली. इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोनोजॉय दत्ता यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करण्याची घोषणा केली आहे. ते स्वत: 25 टक्के कमी वेतन घेणार आहेत. कंपनीचे सिनिअर व्हाइस प्रेसिडेंट्स आणि त्यापेक्षा वरील पदाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 20 टक्के कपात होईल. तर व्हाइस प्रेसिडेंट्स आणि कॉकपिट क्रू च्या पगारात 15 टक्के कपात होईल.

इंडिगोच्या सीईओंनी वेतन कपातीची घोषणा करुन सांगितले की कोरोना व्हायरसमुळे उत्पनात घट झाली आहे. यामुळे एअरलाइन इंडस्ट्रीचे अस्तित्व संकटात आले आहे.

इंडिगोचे फ्लाइट ऑपरेशनचे प्रमुख अशीम मित्रा यांनी गुुरुवारी वैमानिकांना पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये लिहिले की विमान क्षेत्राची आर्थिक परिस्थिती खराब होत आहे. त्यामुळे काही आवश्यक कठोर पावले उचलणं आवश्यक आहे. कोरोना व्हायरसच्या वैश्विक महामारीमुळे जगभर देशांच्या सीमा आंशिक किंवा पूर्णत: सील करण्यात आल्या आहे. त्यामुळे विमान कंपन्यांना बरेच नुकसान होत आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या विमान फेऱ्यांमध्ये मोठी कपात केली आहे. मित्रा यांनी ई मेलमध्ये लिहिले की, आर्थिक परिस्थिती खराब होत आहे, विमान कंपन्या देखील यापासून अलिप्त नाहीत.

एअर इंडियाने देखील कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात 5 टक्क्यांची कपात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एअर इंडियाने आपल्या सर्व इंटरनॅशनल ऑपरेशन्स बंद केले आहेत. सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली आहे.

सरकारने एअर इंडियाला 3000 कोटी रुपये देणे गरजेचे –
एअर इंडियाच्या विक्रीत होणारा उशीर  होत असल्यामुळे सरकारने या कंपनीचे निर्गुंतवणूकीकरण होईपर्यंत सरकारने एअर इंडियाला 3,000 कोटी रुपये देण्याची आवश्यकता आहे. एअर इंडियाची 100 टक्के भागीदारी खरेदी करण्यासाठी सरकारने निविदा जमा करण्याची अंतिम तारीख याआधीच 17 मार्च वरुन 30 एप्रिल केली आहे. 2018 नंतर 2020 मध्ये सरकारने पुन्हा एकदा एअर इंडियाचे निर्गुंतवणूकीकरण करण्यास सुरुवात केली.